किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची नियुक्ती.

प्रतिनिधी : जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून, पुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणारी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी एकमेव समिती म्हणजेच जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके यांची निवड करण्यात आली आहे.
आशिष शेळके हे पत्रकार आहेत, निर्भिड व भ्रष्टाचार विरोधी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत, यांनी पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या आधारे विविध शासकीय कार्यालय व दावाखाने यांना भेटी दिल्या, तेथील उणिवा, तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, तसेच जनतेला होणारा त्रास, यांबद्दल आवाज उठवला. त्यांचे हे सर्व कार्य पाहून तसेच, यांचे पत्रकारी क्षेत्रातले लिखाण व यांच्या अन्याय विरोधी आणि भ्रष्ट कर्मचारी व भ्रष्टचार विरोधातील बातम्या पाहुन जनता माहिती अधिकार समिती च्या पदाधिकार्यांनी आशिष शेळके यांच्या राहत्या घरी भेट देऊन शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी आशिष शेळके यांना समितीचे नियुक्ती पत्र देऊन किनवट तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
आशिष शेळके यांची नियुक्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष बि. बि. हिंगोले यांच्या आदेशावरून आणि समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षा, वैशालीताई गुंजरगे (हिंगोले), शंकरसिंह ठाकुर (मराठवाडा अध्यक्ष) व मारोती शिकारे (मराठवाडा उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नियुक्ती नंतर आशिष शेळके पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही समिती पुर्ण महाराष्ट्रभर भ्रष्टाचार व अन्याय विरुद्ध लढणारी समिती म्हणुन ओळखली जाते, या समितीने माझ्या कामावर विश्र्वास ठेवून माझ्यावर ही जिम्मेदारी सोपवली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे आभार मानतो व मी नक्कीच किनवट तालुक्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार आहे एवढं सांगतो.
आशिष शेळके यांच्या नियुक्तीने सर्वच स्तरातून यांचे शब्दसुमनाने स्वागत होत आहे. तर किनवट तालुक्यातील जे भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांना चांगलीच धास्ती भरली आहे असे सामान्य जनतेतून ऐकण्यास मिळत आहे.

122 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.