किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ची नियोजन व आढावा बैठक संपन्न.

११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद सर्वांनी मिळून अशी करुया की, महाराष्ट्रात इतिहास घडेल – राजेंद्र शेळके.

किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन करण्यासाठी दि. १० आॅक्टोंबर, रविवार रोजी किनवट येथील सिद्धार्थनगर मधील जेतवन बौद्ध विहारामध्ये ११ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची नियोजन व आढावा बैठक संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी किनवट तालुक्यात जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्वांनी ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद नियोजन विषयी आपापले मते मांडली. शेवटी सर्वानुमते ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही दि. १९ व २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येईल असा ठराव संमत झाला. तसेच बैठकीत मत मांडताना सारखणीचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले की, २०१९ मधील १० व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन हे वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या सहकार्याने ऐतिहासिक झाली कारण १० वर्षांमध्ये पहिल्यांदाच आंबेडकर घराण्याला समोर ठेवून सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत १० वी जागतिक बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली होती. म्हणुन या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखालीच आयोजन करण्यात यावी असे सर्वांनुमते बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीमध्ये सर्व युवक धम्म बांधव व महिला कार्यकर्त्यांनी मा. राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून या वर्षी सुध्दा तन, मन, धन व वेळ देऊन ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद घडवून आणु अशी ग्वाही दिली.
राजेंद्र शेळके यांनी बैठकीमध्ये सर्वांचे आभार मानले, त्यांनी म्हणाले की, माझ्या कामावर विश्वास ठेऊन परत मला ही एवढी मोठी जिम्मेदारी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो व नक्कीच या ही वर्षी ची ११ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद ही सर्वांच्या सहकार्याने ऐतिहासिक व पुर्ण महाराष्ट्रात इतिहास घडेल अशी धम्म परिषद आयोजन करु अशी ग्वाही देतो.
बैठकीमध्ये पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, मराठी पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोती शेळके, दैनिक शिल्पकार प्रतिनिधी विशाल भालेराव, इस्लापूर सरपंच नारायण शिंगारे, नागोराव शेळके, मारोती भुरके, देवीदास टारपे शिवाजी भुरके, मनोज सोनकांबळे, गंगाधर शेरे, आनंद वानोळे, हिमायतनगरचे राहुल कदम, नरेंद्र घोडके, गुरू स्वामी, प्रविण हानवते, सारखणीचे मिलिंद कांबळे, बोधडि सर्कल चे मारोती गायकवाड, बाळू बनसोड, कांता दराडे, व किनवट येथील राजेंद्र शेळके, दयानंद पाटील, पप्पू कावळे, शेख अजमल, निखिल कावळे, आकाश आळणे, मारोती मुनेश्वर, सम्राट सर्पे, राजपाल उमरे, आकाश पाटील, विशाल गिमेकर, विश्वदिप भवरे, संतोष शेरे, शुभम भवरे, सम्यक सर्पे, अंबर ठमके, प्रशिक मुनेश्वर, तसेच महिला सामाजिक कार्यकर्त्या गंगुबाई परेकार, जयश्री भरणे, कवीता गोनारकर, शेख रजीया, पत्रकार परविण शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, सामाजबांधव, धम्मबांधव व युवक उपस्थित होते.

181 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.