किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ना.दानवे साहेब, मराठवाडयाचे पहिले रेल्वे मंत्री म्हणुन निदान नांदेड-निजामाबाद पॅसेंजर गाडीच्या फे­या व डयेमु ट्रेन सुरु करा- रेल्वे संघर्ष समिती

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:प्रधानमंत्री मोदीजीनी केंद्रिय मंत्री मंडळाच्या विस्तारात मराठड्यातील खा.दानवे व खा.डॉ.भागवत कराड यांना राज्यमंत्री म्हणुन रेल्वे व अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणुन पदभार सोपविला.विशेष म्हणजे मराठड्याला रेल्वे मंत्री पद पहिल्यांदाच मिळाले.रेल्वे खात्यानी नेहमीच मराठवाडयावर अन्याय केला आहे. कै.गोविंदभाई श्राफ व नांदेडचेच कै.सुधाकरराव डोईफोडेनी तिव्र आंदोलने करुन थोडे-बहुत पदरात पाडुन घेतले आहे.

आजपर्यंत आंदोलनाशिवाय कांही मिळाले नाही.दानवे रेल्वे मंत्री झाल्यावर मराठड्यातील द.म.रेल्वे मार्ग मध्ये रेल्वे विभागाला जोडण्याची प्रलंबित मागणी पुर्ण होईल अशी आशा वाढली आहे.मनमाड ते निजामाबाद पर्यंत दुहेरी रेल्वे मार्ग व मनमाड ते निजामाबाद विद्युतीकरणाचे द्रुत गतीने काम होईल अशी अपेक्षा.
द.म.रेल्वेतील तेलंगाण्या अधिका­यांनी मराठी प्रवाश्यांची नेहमीच उपेक्षा केली आहे.

कोरोना कमी झाल्यावर सर्वत्र पॅसेंजर सेवा सुरु करतांना केवळ नांदेड-काचीगुडा मार्गावर मराठी पट्टयात पॅसेंजर गाडया किंवा डेम्यु ट्रेन सुरु केल्या नाहीत.

तसेच धर्माबाद-करखेली उमरी व सिवनगाव हे मराठी भाषीक रेल्वे स्टेशन नांदेड विभागीय कार्यालयाशी न जोडता, सिकंद्राबादशी जोडले आहे.

कसलीही आर्थिक तरतुदीची गरज नसलेल्या किमान दोन मागण्या आपण त्वरीत मंजुर करुन मराठी रेल्वे प्रवाश्यांना दिलासा द्याल,ही तीव्र अपेक्षा धर्माबाद रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने शंकरराव जाधव यांनी व्यक्त केली आहे

70 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.