1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत वन्यजीव सप्ताह किनवट वनविभागातर्फे साजरा
किनवट (प्रतिनिधी ) .. वन्यजीव सप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र किनवटअंतर्गत विविध गावांमध्ये वन्य प्राण्या बाबत जनजागृती करून हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आले व जगला लगत फलकही लावण्यात आले आहे . 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत वन्यजीव सप्ताह किनवट वनविभागातर्फे साजरा करण्यात आला या सप्ताहात वनपरिक्षेत्रातील विविध वन परिमंडळात नागरिकांना वन्य प्राण्यांच्या बाबत जनजागृती करून हिंस्त्र प्राण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व माहीती देण्यात आली तसेच जंगला लगत हिंस्र प्राण्याबाबत माहिती व त्यांच्यापासून संरक्षणाचे फलकही लावण्यात आले आहे . हा वन्य जीव सप्ताह सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोडयांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी टी माझलकर, के.जी . गायकवाड , बी . एस . संतवाले ,एस एम यादव, एस एन सांगळे, रवी दांडेगावकर वनरक्षक जी एन कापसे ,डी एन डाळके, एम वि दांडेगावकर , फोले , कवीता पवार, कोमल मरसकोल्हे ,घायाळ , वाघमारे , झंपलवाड , आदी वनकर्मचारी व वनमजूर यांनी यशस्वीपणे पार पडला .