रूक्मीनबाई धोंड यांचा सत्कार
जळकोट/ प्रतिनिधी गोपाळ केसाळे
आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धोंडवाडी ता. जळकोट येथील श्रीमती रुक्मिणीबाई मोहनराव धोंड यांचा सत्कार जीवनगौरव राष्ट्रीय कार्यक्रमाचे समन्वयक विजय धबडगावकर, धनवंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रेय पाटील, प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या महानंदा दीदी बहन यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार समारंभ उदगीर येथील प्रसिद्ध भालचंद्र ब्लड बँक यांच्या सौजन्याने तसेच धन्वंतरी मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने थोडेसे माय बापासाठी उपक्रमा अंतर्गत पंचक्रोशतील आपापल्या कुटुंबाचा प्रमुख आधार असणारे काही निवडक जेष्ठ नागरिक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत आयुष्यभर आपल्या संसाराचा गाडा सुरळीत पार पाडलेल्या व त्यातून समाजभूषण पुत्र निर्माण करणाऱ्या माय बापाचे थोडेसे ऋण व्यक्त करण्यासाठी ही छोटासा उपक्रम व सत्कार समारंभ या सत्कार समारंभात सत्कारमूर्ती श्रीमती रुक्मिणीबाई मोहनराव धोंड यांचा सत्कार समारंभ जेष्ठ नागरिक दिनी संपन्न झाला. श्रीमती रुक्मिणीबाई मोहनराव धोंड या शासकीय दूध डेरी चे सेवानिवृत्त कर्मचारी वामनराव धोंड यांच्या मातोश्री आहेत.