अखेर नियतीने डाव साधला…मातंग तरुणांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे..लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-कै.सोमनाथभाऊ कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन
मातंग समाजाचे नेते ,लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष- कै.सोमनाथ भाऊ कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजली. ते गेले १५ दिवस झाले सोलापूर येथील हॉस्पिटल औषधोपचार घेत होते. दि.०४/०५/२०२१ रोजी आज रात्री १० वा. च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
मातंग समाजाला भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.मातंग समाजाचा आधुनिक फकीरा ज्याने समाजासाठी अख्ख आयुष्य वेचल, समाजावर होणा-या अन्याय अत्याचार्याच्या विरोधात रणशिंग फुंकून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावली, तो समाजात फिरत होता तर समाजात ढाण्या वाघाची स्वारी निघाल्या सारखं असायचं, त्या वाघाचा एक एक शब्द म्हणजे ज्वालामुखी सारखे होते, ना डर ना फिकर,ज्याच्या अंगात लहूजीच रक्त सळसळतं होत, डोळयात फकीराचा बंड दीसत होता असा हा मातंगाचा विर समाजाच्या परिवर्तनासाठी धडपडत होता, ज्याच्या ईशा-यावर मातंगाच्या पोरामध्ये हत्तीच बळ आणि वाघाच धाडस आल होत, तरूण पोरामध्ये क्रांतिकारी विचार पेरणारा तो खरा योद्धा होता ज्या मातेने अशा विराला जन्म दिला त्या मातेला सलाम,
महाराष्ट्रातील तमाम मातंग तरुणांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे आणि तरूणांना समाज परिवर्तनवादी विचाराचे डोस पाजणारे एक ज्वालाग्रही व्यक्तीमत्व आज समाजाने गमावलेल आहे, सोमनाथ भाऊ कांबळे हे एक ज्वालामुखी होता ,मातंगाचा खरा दरारा होता, असा धाडसी असा बलवान असा कर्तृत्वान योद्धा समाजात जन्माला आला याचा आम्हाला सार्थ अभिमान होता, एक जिगरबाज, खतरनाक कुणाच्या बापाला न भीणार एक मांगाच लेकरू आज आमच्यातुन निघून गेल याच दुःख संबंध मातंग समाजाला झाल आहे, मातंग समाजावर आज खर्या अर्थाने आभाळ कोसळल आहे, दुःखाच डोंगर कोसळल आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू भरून आले आहेत, आज समाजात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधीच भरून निघणार नाही, आज कांबळे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखात मी डाॅ. देवणीकर व माझा सर्व देवणीकर परिवार सहभागी आहे.
मातंग समाजाच्या सामाजिक न्यायासाठी अख्खे आयुष्य वेचलेल्या एका रांगड्या ढाण्या वाघाला समाज मुकला असून सोमनाथ भाऊ यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सोमनाथ भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!