किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विकासात्मक बाबी बैठकीत अभ्यासपूर्ण मांडून मार्गी लावण्याचं दिशा समितीचे सदस्य मारोती सुंकलवाड यांचं महत्वपूर्ण कार्य

किनवट : गोकुंद्याची१८ कोटीची रद्द झालेली पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करणे, पाडलेल्या निजामकालीन इमारतीच्या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेला नवीन वर्ग खोल्या, कोठारी नात्यावरील पूल मंजुरी, २ कोटीची बोधडी (बु ) ची रखडलेले पेयजल योजना तात्काळ चालू करणे व उप जिल्हा रुग्णालयात १०० खाटा मंजूर करणे, आदी विकासात्मक मागण्या दिशा समीती बैठकीत अभ्यासपूर्ण मांडून मार्गी लावण्याचं महत्वपूर्ण कार्य दिशा समितीचे सदस्य मारोती सुंकलवाड यांनी केल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

नांदेड येथील डॉ. शकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात नांदेड जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांचेसह सर्व जिल्हा कार्यालय प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत दिशा समितीचे सदस्य मारोती कानबाराव सुंकलवाड यांनी अत्यंत महत्वाच्या विकास कामावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. जलस्वराज्य योजनेतील गोकुंद्याची रद्द झालेली १८ कोटीची पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन योजनेतून मंजूर करावी तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून बोधडी (बु)ची २ कोटीची रखडलेली पाणी पुरवठा योजना तात्काळ चालू करावी, हे पोटतिडकीने त्यांनी सादर केले.
नगर पालिका नुतन कार्यालयासाठी निजामकालीन ‘ सराय ‘ इमारत पाडल्याने छत नसलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना नविन वर्ग खोल्या मंजूर कराव्यात, शनिवारपेठकडे जाणाऱ्या कोठारी नाल्यावरील पूल मंजूर करावे, गोकुंद्यातील ठाकरे चौक ते हबीब कॉलनी पर्यंतचा रस्ता दुरुस्ती, गोकुंद्याच्या उप जिल्हा रुग्णालयात १०० खाटांना मंजूरी द्यावी, खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजहिताच्या महत्वपूर्ण विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करून व लेखी निवेदन देऊन मारोती सुंकलवाड यांनी दिशा समिती बैठकीत सभागृहाचं लक्ष वेधून तर घेतलच पण कामांच्या मंजुरीचं फलित पदरात पाडून घेतलं. या विकासात्मक बाबीस न्याय दिल्या बद्दल समस्त नागरिकांच्या वतीने त्यांचं कौतुक होत आहे .

78 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.