किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक चालकास शेतकऱ्यांचा पिक पेरा आँनलाई करण्यासाठी आदेश द्यावेत. वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी

शेतात जाऊन पिकांची नोंदणी करताना तलाठ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर अनेकदा तलाठी मागच्या वर्षीचेच पिक अंदाजे नोंद करतो. परंतु, आता शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून पिकांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ई-पिक नोंदणी हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
खरीप हंगाम संपल्यानंतर आता रब्बीची तयारी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज घेण्यासाठी सात-बारा उताऱ्यावरील पिकांची नोंद महत्त्वाची ठरते. परंतु, तलाठ्यांनी अंदाजे केलेल्या नोंदीचा शेतकऱ्यांना अनेकदा फटका बसतो. यावर आता शासनाने पर्याय शोधला असून शेतकऱ्यांना घरबसल्या पिकांची नोंदणी स्वत:हून करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.कृषी व महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यावर शेतकऱ्यांना त्यांनी पेरलेल्या पिकांची क्षेत्रनिहाय माहिती भरून पिकाचा फोटो अपलोड करून पिकांची नोंदणी करता येणार आहे. त्यामध्ये गट क्रमांक, जमीन जिरायत आहे की बागायत, सध्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली आहे, यासह संपूर्ण माहिती नोंदविता येणार आहे. ही संपूर्ण माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पोहचणार असल्याने पिक नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. सर्व ग्रामपंचायत आँपरेटर ला शेतकर्याचा पिक पेरा आँनलाई करण्यासाठी आदेश द्यावेत.
सर्व शेतकरी सुशिक्षित नाही आहेत.
शेतकऱ्यांनचा विचार व्हावा.व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना पिक पेरा नोंदणी करण्यासाठी आदेश द्यावे अशी मागणी वैभव घाटे यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे

56 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.