किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोहा नगरपालिकेच्या वतीने पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

लोहा / प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर
लोहा शहरात काल दिनांक ६ सप्टेंबर पासून सतत दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोहा नगर परिषदेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून लोहा न.पा. च्या नाले साफसफाई करणे पूराचे पाणी तुंबलेले काढणे घराची पडझड झालेली असल्याने त्यांना मदत करणे ढिगारे भरणे आदी कार्य चालू आहेत.
मराठवाड्यात अग्रेसर असलेली लोहा न.पा.ही शहरातील प्रत्येक नागरिकाला आपली वाटते नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शहराचा चौफेर करून स्वच्छता, पाणीपुरवठा, साफसफाई आदी कामे सुरळीत चालू असून काल दि.६ रोजी पासुन लोहा शहरात संततधार पाऊस पडत असल्यामुळे लोहा शहरातील नदीला पूर आला. शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी पडल्यामुळे तुडुंब भरल्या होत्या तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली होती. यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड , यांच्या सह सर्व कर्मचारी यांना सुचना देणे कामकागाचा आढावा घेणे हे डोळ्यात तेल घालून चालू होते.
दि. ७ रोजी प्रचंड प्रमाणात लोहा शहरात पाऊस पडल्यामुळे उध्दवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे स्वतः भर पाऊसात शहरात फिरून ठिक ठिकाणी तुंबून भरलेल्या नाल्यांचे पाणी सुरळीत करण्यासाठी कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले.

87 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.