किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

रामेश्वर गायराण जमीन प्ररकरणात मंडळ अधिकारी माळोदे व पवळे निलंबित!

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.3. जिल्यातील धर्माबाद तालुक्यात रामेश्वर येथील कोट्यावधी रुपयांच्या किंमतीची ५० आर.गायराण जमीन तात्कालीन तलाठी सय्यद मुर्तुजा,तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व कार्यरत असलेले वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी संगनमत करून शेख ताहेर शेख बाबुमियाॅ व हनमंतराव दत्तराम देवणे यांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने फेरफार केले होते.सदरील प्ररकरणाची गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे लेखी तक्रार केल्यामुळे शेळके यांनी सदरील प्ररकरणाचे अपील शासनाकडून दाखल करून घेतले.व सुनावणी लावून सदरील प्ररकरणाची कसून चौकशी केली असता,सदरील गायराण जमीनीचे फेरफार नियमबाह्य पद्धतीने केल्याचे उघडकीस आल्यामुळे गायराण जमीनीचे फेरफार रद्द करून दोषींवर कठोर कारवाई व्हावे, यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी उशीरा का होईना,तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांना निलंबित केल्यामुळे महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील रामेश्वर येथील ५० आर.गायराण जमीन नियमबाह्य पद्धतीने तात्कालीन तलाठी सय्यद मुर्तुजा, तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी संगनमत शेख ताहेर शेख बाबुमियाॅ व हनमंतराव दत्तराम देवणे यांच्या नावावर फेरफार केल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा नुकसान झाला होता.परंतु सदरील प्ररकरणाची तक्रार गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यामुळे सदरील प्ररकरणाची दखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घेतली.व शासनाकडून अपील दाखल करून घेतले.सदरील प्रकरणाची वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली आहे.सदरील प्ररकरणातील कागदपत्रांचे बारकाईने तपासणी केल्यास नियमबाह्य पद्धतीने गायराण जमीनीचे फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सदरील गायराण जमीनीचे फेरफार रद्द करून दोषींवर निलबंनाची कार्यवाही करण्यात यावे.व त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.परंतु जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवून सुध्दा दोषींवर कारवाई होत नसल्यामुळे दि.१४ ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनमंत पाटील जंगदबे पिंपळगावकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नायगाव विधानसभा अध्यक्ष पंडीत पाटील जाधव यांनी उपोषण केले होते.व सदरील प्ररकरणात आमच्या दैनिकात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी उशीरा का होईना, तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांना निलंबित करून निलबंन कालावधीत मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांना कंधार व तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे यांना लोहा येथील तहसिल कार्यालयात हजर राहून सेवा करावी लागणार आहे.तसेच तेथील तहसिलदार यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही.तसेच निलबंनाच्या कालावधीत खाजगी नौकरी स्विकारूनये किंवा धंदा करनये,तसे केल्यास निलबंन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील.असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु सदरील प्ररकरणातील दोषी असलेले तात्कालीन तलाठी सय्यद मुर्तुजा व शेख ताहेर शेख बाबुमियाॅ व हनमंतराव दत्तराम देवणे यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे.तसेच सर्व दोषींनी संगनमत करून शासनाची करोडो रुपयांची जमीन हडप करण्याचा डाव रचला होता.त्यामुळे सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.तसेच तात्कालीन मंडळ अधिकारी बी.डी.पवळे व वादग्रस्त मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी केलेल्या आतापरेंत च्या गैरकारभाराची विभीगीय चौकशी होणार असून सदरील विभागीय चौकशीत अनेक गैरकारभार उघडकीस येणार असल्याची चर्चा होत आहे.सदरील निलबंनाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या सुचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दि.२ सप्टेंबर रोजी काढले आहे.

132 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.