किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मी सर्वस्व ना.अशोकराव चव्हाणमुळे -आ.अमर राजुरकर

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नविन नांदेड*:दि.31.मि सर्वस्व केवळ ना.अशोकराव चव्हाण यांच्यामुळे असल्याचे प्रतिपादन आ.अमर राजुरकर यांनी सिडको येथील आयोजित नागरी सत्कार सोहळा प्रंसगी व्यक्त करून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले.

सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ. अमरभाऊ राजूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण केंद्र सिडको शिवाजी चौक येथे ३१ आगसषट रोजी करण्यात आले होते यावेळी माजी पालकमंत्री डि.पी.सावंत, आ.मोहनराव हंबर्डे,प्रदेश सचिव अँड.सुरेद्र घोडजकर ,पक्षप्रवक्ते संतोष पांडागळे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे, राजू काळे,श्रिनिवास जाधव,सौ.मंगला जाधव, सौ.दिपाली मोरे,माजी नगरसेवक संजय इंगेवाड,संजय मोरे, सिध्दार्थ गायकवाड,माजी नगरसेवक डॉ.करूणा जमदाडे,प्रा.ललीता शिंदे,ऊदय देशमुख,डॉ.अशोक कंलत्री, डॉ.नरेश रायेवार,दलितमित्र नारायण कोलंबीकर,माधव अंबटवार,सतिश बसवदे,राजु लांडगे,बापुसाहेब पाटील,प्रमोद टेहरे,निवृत्ती कांबळे,सोशल मिडीयाचे इजी.हरजिनंदर संधू यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा झाला.

यावेळी आ.अमरभाऊ राजुरकर यांनी मनपाच्या प्रत्येक वार्डसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये दिले असून सहा महिन्यांचा काळात प्रत्येक प्रभाग हा विकासात्मक दिसेल ,रस्ते,पाणीपुरवठा व मुलभूत सुविधा साठी ही निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिलहायासाठी चारशे कोटीं रुपये विकासासाठी आणल्याचे सांगुन , समृध्दी महामार्ग सह सिडको हस्तांतरित प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सर्वांचा आर्शिवादाने आमदार झाल्याचे सांगुन नेते अशोकराव चव्हाण यांच्ये हात बळकट करण्यासाठी खंबीर पणे पाठीमागे राहुन क्रागेस पक्षाला साथ द्यावी असे आवाहन केले.

नागरी सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष विनोद माधवराव कांचनगिरे यांनी केले तर सुत्रसंचलन संतोष देवराये, शशिकांत हाटकर यांनी केले.

बालाजी पाटील,आंनदराव गायकवाड,एस.पी.कुंभारे, के.एल.ढाकणीकर,नितीन वाघमारे, पदमणे,सुनिता राठोड,माने शेख मोईन लाठकर,अहातखान पठाण,गिरीधर मैड, देविदास कदम,योगेश माने,यांच्या सह जेष्ठ पदाधिकारी,महिला व युवक यांच्या जंबो कार्यकारिणी,महिला कार्यकारिणी अश्या दोन्ही कार्यकारिणी ची घोषणा आ.अमरभाऊ राजुरकर यांनी केली.

यावेळी विविध राजकीय पक्षातुन आलेल्या अनेकाचा काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काँग्रेस पक्ष असलेली दस्ती देऊन सत्कार करण्यात आला.या सोहळया निमित्ताने सिडको परिसरात भव्यदिव्य फटाक्यांच्यी अतीषबाजी व विविध ठिकाणी करण्यात आलेल्या स्वागत मुळे नवचैतन्य निर्माण झाले. अध्यक्षीय समारोप माजी पालकमंत्री डि.पी.सावंत यांनी केले

193 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.