किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

व्यापारी जगु देत नाही, अन शासन मरु देत नाही

शेतक-यांचे धान्य खरेदी करुन दोन महिण्यांचा कालावधी होऊन देखिल त्यांचे चुकारे देण्यात आलेले नाही

किनवट प्रतिनिधी:.  दिनांक २६ व्यापारी जगु देत नाही अन शासन मरु देत नाही अशी अवस्था किनवट तालुक्यातील शासनाला भरड धान्य विक्री केलेल्या शेतक-यांची झाली आहे कारण शेतक-यांचे धान्य खरेदी करुन दोन महिण्यांचा कालावधी होऊन देखिल त्यांचे चुकारे देण्यात आलेले नाही, तालुक्यातील शेतक-यांच्या भरड धान्य खरेदी करण्याकरिता मोठा गाजावाजा करुन शासनाच्या आदिवासी विकास महामंडळा मार्फत सुरवात करण्यात आली ज्यामध्ये लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय लाटण्यावरुन स्पर्धा देखिल लागली होती. परंतु ज्या प्रमाणे शेतक-यांची ज्वारी या पिकाची खरेदी शासनाकडुन करण्यात आली त्या प्रमाणे त्यांचे चुकारे दोन महिण्यांचा कालावधी होऊन देखिल अदा करण्यात न आल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे.

किनवट तालुक्यातील शेतकरी मुकुंद नारायणराव नेम्मानिवार यांने ज्वारी या पिकाचे चुकारे अदा करण्यात नाही आले तर दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती दिनी आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे.

ज्वारी या पिकाला बाजारपेठेत खाजगी व्यापा-यांनी १२०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करुन एकप्रकारे शेतक-यांची लुट केली होती त्यामुळे आर्थिक पिळवणुक झालेल्या शेतक-यांनी त्यांचे पिक शासनाच्या खरेदी केंद्रावर पाठवले जिथे ज्वारी या पिकाला २६०० रुपये प्रति क्विंटल एवढा दर होता परंतु शेतक-यांच्या पिकाची खरेदी होऊन दोन महिण्यानंतर देखिल चुकारे अदा करण्यात न आल्याने उसनवारी करुन, व्याजाने पैसे आणुन लागवण केलेल्या शेतक-याला यामुळे आर्थिक तफावतीचा कोणताच फायदा झालेला नाही त्यातल्यात्यात खाजगी शावकारी चे प्रचंड व्याजदर यामुळे शेतक-यांना पळसाच्या झाला तिन पाने म्हणण्याची वेळ आली आहे.
तरी शासनाने शेतक-यांच्या भरडधान्याचे चुकारे अदा करुन त्यांना मदत मिळवुन द्यावी व आमत्मदहन सारख्या कृत्याकडे शेतकरी प्रवृत्त होणार नाही. अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी बाळगुन आहे.

303 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.