शिवणी येथे पावसामुळे आलेल्या पुरात दोन महिलांचा वाहून गेल्याने मृत्यू
[ शिवणी प्रतिनिधी प्रकाश कार्लेवाड ] किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात काल दि.२४ आगस्ट रोजी दुपारी ३ च्या दरम्यान अचानक ढगफुटी सदृश्य पावसाची सुरुवात झाली यात मागील आठवड्यापासून उघडीप दिल्याने शेतात निंदन करण्यासाठी कामाला गेलेल्या महिला पाऊस येत असून नाल्याला पूर येण्याची शक्यता असल्याने त्या पाच महिला एक पुरुष घराकडे वाटेने निघाले व शेताकडून नाल्याच्या पलीकड च्या कट्ट्यावर ओलांडुन घराकडे जात असताना अचानक पुराचा लोंढा आल्याने यातील एकूण सहा पैकी तीन महिला एक पुरुष बाल-बाल बचावले तर दोन वृद्ध महिला पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी व धक्का दायक घटना शिवणी येथे घडली असून यात १) महअल्ली रज्जाक अगुवाड वय ६० व २) प्रेमलाबाई लछन्ना तम्मलवाड वय ६० या दोन्ही महिलांचे पुरात वाहून मृत्यू झाले.
निंदन करण्यासाठी शेतात गेलेल्या महिला पावसाच्या धास्तीने एकूण पाच महिला एक पुरुष पैकी तीन महिला एक पुरुष बाल-बाल बचावले तर दोन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना किनवट तालुक्यातील शिवणी येथे दि.२४ आगस्ट मंगळवार रोजी दुपारी तीन च्या दरम्यान घडली.
सविस्तर असे की किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात दुपारी ३ च्या दरम्यान अचानक ढगफुटी सदृश्य पावसाची सुरुवात झाल्याने शेतात निंदण करण्यासाठी गेलेल्या एकूण पाच महिला एक पुरुष पावसाच्या भीतीने घराकडे निघाले असता शिवणी तांडा पांदण रस्त्यावर एक मोठा नाला ओलांडण्याच्या प्रयत्न करत असताना हे सहा जण एकाला एक हात धरून जोडीने आगोदर दोन महिला सुरक्षित नाला ओलांडली त्या नंतर उर्वरित चार पैकी एक पुरुष एक महिला पुरात वाहून जाता-जाता बाल- बाल बचावले तर उर्वरित दोन महिला नाला ओलांडताना अचानक पुराचा मोठा लोंढा आल्याने यात दोन वृद्ध महिला पुरात वाहून गेल्या यात वाहून गेलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृतदेह अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर सापडले तर दुसऱ्या महिलांचे मृतदेह सापडत नसल्याने गावातील नवयुवक व नागरिकांनी शोध घेतल्यानें दुसऱ्या महिलेचे अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडले.ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली तर गावातील नागरिकांसह अनेकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.तर वृत्त लिहे पर्यंत या घटनेची पाहणी करण्यासाठी किनवट तालुक्याचे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव सह महसूल प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार मेश्राम मंडळाधिकारी यु.आर.जाधव व कर्मचारी गोविंद पांपटवार.सह कोतवाल गजानन टारपे यांनी शिवणी येथे येऊन सदरील घटनेची घटना स्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला.या वेळी इस्लापुर पोलीस स्टेशनचे सपोनि शंकर डोडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि सावंत सपोउनि अंकुश लुंगारे सह इतर पोलीस कर्मचारी होते तर शिवणी येथील सरपंच लक्ष्मीबाई डुडूळे व पोलीस पाटील अनुसायबाई बोंदरवाड यांचे प्रतिनिधी हन्मंतु बोंदरवाड सह गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.तर या दुर्देवी घटनेची शिवणी व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त होत आहे.