किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट वन विभागाच्या पथकाने ऑटो, मोटारसायकल सह अवैध सागवानी कटसाईज केले जप्त.

ता.प्रतिनिधी : 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता किनवट वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चिखली ते इंजेगाव दरम्यान गस्त करीत असताना संशयास्पद ऑटो चा पाटलाग केला असता ऑटो चालकांनी इंजेगाव नाका येथे ऑटो सोडून पळ काढला यावेळी घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पिवळा रंगाचा अँपे ऑटो T S 17 – T 2125 या क्रमांकाचा जप्त केला .
सोबत सागवानाचे करसाईज नग 61 व घ.मी. 0. 1690 ज्याची किंमत दहा हजार पाचशे सव्वीस रुपये व ऑटो ची किंमत 75 हजार रुपये जप्त केला आहे . तसेच या आटो चा पाठलाग करत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक मोटरसायकल ही सापडली त्या मोटरसायकलवर 28 नग 0.0982घनमीटर ज्याची किंमत 6117 रुपये व मोटरसायकल चे अंदाजे किंमत सात हजार रुपये जप्त करण्यात यश मिळवले दोन्ही घटनेतील आरोपी फरार आहेत . वनविभागाच्या या पथकात सहायक उपवनसंरक्षक एम. आर .शेख यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे नवनियुक्त वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद राठोड , चिखलीचे वनपाल रवी दांडेगावकर , के .जी . गायकवाड , एस. आर .सांगळे , माझलकर, यादव, वनरक्षक फोले, झंपलवाड , चिबडे वाहन चालक आवळे इत्यादी वनकर्मचारी होते .

1,015 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.