किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता हिमायतनगर येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न

हिमायतनगर :-तालुक्यातील परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.
ता अध्यक्ष तुकाराम तांडेरवाड यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.
ता सचिव अंकुश खाणारे यानी संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवाना संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा हिमायतनगर तालुक्यात स्थापन करून आपला हक्कासाठी डाकोरे पाटिल यांच्या पाठिशी उभे राहाण्याचे आव्हान केले.

डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांनी संघटितपणे संघर्ष केल्यामुळे नांदेड जिल्ह्यात कांही प्रमाणात न्याय मिळाला व बरेच प्रश्नाला न्याय मिळत नसल्यामुळेदिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे नांदेड जिल्ह्यातील कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि 28 जुन21ते 30 जुलै 21 पर्यंत चालु असलेल्या ग्रामपंचायत समोर थालीनांदा आंदोलनात 245 गावातील दिव्यांगानी ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करून जागे केल्यामुळे मा जिल्हाधिकारी साहेब यांनी 3 आँगस्ट ला दिव्यांग कायदा 2016 च्या अंमलबजावणी साठी कार्यशाळा घेऊन दिव्यांगाच्या सवलतीसाठी कडक आदेश दिले.
दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी.
दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल. दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती,जिल्हा परिषद,
नगरपंचायत,नगरपालिकर्न महानगर पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, ईत्यादी सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ता अध्यक्ष तुकाराम तांडेरवाड, अंकुश खिलारे ,म ता सचिव सोनुताई मलाफुले, शहर अध्यक्ष किसन ढोणे, दिंगाबर दोरेवाड, रामराव पा जाधव,कार्तिक रापेवार, बालाजी सोळंके, विक्रांत पाळजकर परिसरातील दिव्याग बांधव या मेळाव्यास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक दिले

246 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.