किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट: राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 11 प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी व 132 बँकेचे दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण 143 प्रकरणे सामंजास्याने मिटविण्यात आलेत दाखलपुर्व 132 प्रकरणामध्ये एकूण 35 लाख 33 हजार रूपयांचा रक्कमेवर तडजोड करण्यात आली.

किनवट : (तालुका प्रतिनिधी) तालुका विधीसेवा प्राधिकारण व वकिल संघाच्या वतीने 1 ऑगस्ट् रोजी किनवट न्यायालयात आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 11 प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी व 132 बँकेचे दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण 143 प्रकरणे सामंजास्याने मिटविण्यात आलेत दाखलपुर्व 132 प्रकरणामध्ये एकूण 35 लाख 33 हजार रूपयांचा रक्कमेवर तडजोड करण्यात आली.
कोरोना नियमांचे पालन करून किनवट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजीत केले होते. याकरीता 2 पॅनल होते एका पॅनल प्रमुख म्हणून विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे तर पॅनल सदस्य् म्हणून ॲङ डि.जे.कोट्टावार व के. मुर्ती यांनी काम पाहिले. दुसऱ्या पॅनलवर प्रमुख म्हणून सह.दिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे तर सदस्य् म्हणून ॲङ एस.एम. राठोड व प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी काम पाहिले. यावेळी सरकारी वकील अशोक पोटे, ॲङ अरविंद चव्हाण, ॲड, आकाश कोमरवार, ॲङ दिलीप काळे, ॲड. गावंडे, ॲङ शिरपुरे, ॲड. उदय चव्हाण, ॲड. श्ंकर राठोड, ॲड. कुरेशी, ॲड. येरेकार, ॲड. टेकसींग चव्हाण, ॲड. गजभारे, ॲड. नयन मुनेश्वर्, ॲड. शामीले, ॲड. दराडे, ॲड. आयतलवाड सह विविध बँकेचे अधिकारीसह अनुराग भुसमे, संतोष चौधरी, शैलेश आढाव, विनोद झोडे, संतोष ताडपेल्लीवार, नितिन वानखेडे, राहूल काबंळे, आर.व्ही. दलाल, मनवर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये यशस्वीतेसाठी वर्षा बोलेनवार, एल.वाय. मिसलवार, घुले, चिटमलवार, जी.डी. सोनटक्के, कुलकर्णी, धोटे, मगदुम, माने, केंद्रे, निलवर्ण, कावळे बारसे, सुर्यवंशी के.व्ही. आडे, शेख बाबु, तेलंग, शेख शौकत, गौतम जोंधळे, उकंडराव, दोकलवार, पठाण सहीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

110 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.