किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – खासदार हेमंत पाटील

किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनास दिले असून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
मागील चार दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीपाच्या कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत .
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर या तालुक्यात इतर तालुक्यापेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातही अतिवृष्टीने शेती बाधीत झाली आहे. काही ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी महामार्गवरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली तर रस्त्यांवरिल पूल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मतदारसंघातील काही भाग अवर्षणग्रस्त आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यावर दरवर्षी अनेक संकटे ओढवत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील सातत्याने कार्य करत असून हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण सदैव तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले. मागील चार- पाच दिवसापासून पावसाने थैमान घातले असून यामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात घुसून जमिनी खरडून गेल्यामुळे जमिनीचेही नुकसान झाले आहे .
याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी निर्देशित केले आहे .

70 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.