भाजपाच्या पहिल्या यादीत भीमराव केराम यांना उमेदवारीची घोषणा मतदारसंघात आनंद व्यक्त
किनवट/प्रतिनिधी: भारतीय जनता पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती ची बैठक जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दि.16 आक्टो.2024 ला संपन्न झाली.
या बैठकीत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी,श्री राजनाथ सिंह, मा.अमित शाह व केंद्रीय निवडणूक समिती चे अन्य सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक2024 ची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात 99 उमेदवार ची निवड करण्यात आली आहे.
यात किनवट/ माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाची पावती मिळाली असून जनता माझ्या कामावर खुश आहे म्हणून मला पक्षाने तिकीट दिल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात किनवट विधानसभा मतदारसंघासाठी भरीव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल मतदारसंघातून त्यांच्यावर शुभेच्छा च्या वर्षा होत असून अनेकांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.