किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दर रविवारी बुद्ध विहारात जावे व बुद्ध धम्म व संघाची प्रेरणा घेऊन दररोज च्या व्यवहारात उपयोग करून,कल्याण व सुखी व्हावे-पूज्य भन्ते विनयशील

किनवट (गोकुंदा )दर रविवारी बुद्ध विहारात जावे व बुद्ध धम्म व संघाची प्रेरणा घेऊन दररोज च्या व्यवहारात उपयोग करून,कल्याण व सुखी व्हावे-पूज्य भन्ते विनयशील.राजर्षी शाहू नगरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे पूज्य भन्ते विनयशील, छत्रपती संभाजीनगर,यांनी भेट दिली, विहारात वर्षावास निमित्त नगरातील उपासक, उपासिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन व पठण आषाठ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा पर्यंत करित आहेत, करणार आहेत.दररोज सायंकाळी 8 वाजता त्रिशरण, पंचशील, बुद्ध, धम्म, संघ वंदना घेण्यात येवून धम्मपालन गाथा व प्रवचन होतात,रविवार दिनांक 15/09/2024 रोजी भन्ते विनयशील यांनी धम्मदेशना दिली, आना पान सती, ध्यान व अष्टांगीक मार्ग यावर भाष्य करून, उपासिका, उपासक यांनी विहारात येवून विचाराचे आचरण करून सुखी व्हावे व कल्याण साधावे, आनापान सती चा सराव करून घेतले, संचलन प्रा. डॉ. आनंद भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन आयु. उपासिका गंगासागर वैरागडे, उपासिका नंदाताई नगारे, उपासिका सुनंदाताई पाटील, यांनी केले, याप्रसंगी विपश्याना साधिका आयु. चित्रा ताई नगराळे हया प्रामुख्याने उपस्थित होत्या,कार्यक्रमास आयु. मित्रविंदा कांबळे, आयु. विमलताई लोकरे, मुजमुले सर, मुजमुले ताई, आयु. नगारे व बाल -बालिका उपस्थित होते, आशीर्वाद गाथा भन्ते जी ने घेऊन कार्यक्रमाची सांगता केली .

76 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.