किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वन विभागाच्या गस्ती पथकाने अवैधसागी कटसाईज व मोटारसायकल केली जप्त

किनवट (प्रतिनिधी ) : वन विभागाचे गस्ती पथक गोकुंदा रोडवर गस्त करीत असताना संशयावरून पकडण्यासाठी मोटरसायकलचा पाठलाग केले असता .सागवान तस्करांनी देखील आणि सागवानाचे अवैद्य कट साईज सागवानाचे नग रस्त्यावरच फेकून पोबारा केला .
दि . 9 रोजी किनवट – गोकुंदा रोडवर वन विभागाचे गस्ती पथक गस्त करत असतांना संशयावरून एका मोटासायकल चा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून सागवान तस्कर पळून गेले . वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोटासायकल जवळ जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी कटसाईज नग -24 ज्याची किंमत एक हजार रुपये व मोटर सायकलची किंमत 30000 असा एकूण 31000 रुपये चा मुद्देमाल जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हांची नोंद केली आहे . या कार्यवाहीत उपवनसंरक्षक नांदेड वाबळे,सहा . वनसंरक्षक जी. डी.गिरी व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चिखली एम.एन.कतुलवार , एस.एम.कोम्पलवार , एस.एम.यादव ,वनरक्षक रवी दांडेगावकर ,अनिल फोले , बालाजी झंपलवाड तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत सक्रिय सहभाग होता.

जप्त केलेल्या अवैध सागी मालाचा तपशील खालील प्रमाणे नग संख्या 24 घ मी.0.0420 माल किंमत 886,=00 रुपये मोटासायकल किंमत अंदाजे 30000=00रुपये जप्त केलेला एकूण मुद्देमाल 30886=00 रुपयाचा आहे.

653 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.