किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शाळेच्या उत्कर्षासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात’ सहभागी होऊन लाखोंची बक्षिसे मिळवा -गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने

किनवट : तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानामध्ये सहभाग नोंदवावा, आपल्या शाळेचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करावा व तालुका ते राज्यस्तरीय लाखोंची बक्षिसे मिळवा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी केले आहे.
     महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास करणे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान-2024 सुरू केले आहे.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी यात सहभागी व्हायचे आहे. एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी 2024 हा या अभियानाचा कालावधी आहे.
         अभियानात सहभागी होवून शाळांना पुढील प्रमाणे गुणांकन देण्यात येईल : विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग-60 गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग-40 गुण.सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मुल्यांकन- आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामूळे तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण 04 टप्पे पारितोषिक आहेत. ती याप्रमाणे : तालुका स्तर- पहिले बक्षीस-03 लक्ष, दुसरे बक्षीस- 02 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस-01 लक्ष रुपये , जिल्हा स्तर- पहिले बक्षीस-11 लक्ष, दुसरे बक्षीस-05 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस-03 लक्ष रुपये, विभाग स्तर- पहिले बक्षीस-21 लक्ष, दुसरे बक्षीस – 11 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस-07 लक्ष रुपये, राज्यस्तर- पहिले बक्षीस-51 लक्ष, दुसरे बक्षीस-21 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस-11 लक्ष रुपये.
      राज्य स्तरावरील स्पर्धा- प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल. जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग- सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.
      तरी जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे व यामध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या शाळेचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करावा, असे गट शिक्षणाधिकारी श्री बने यांनी केले आहे.

97 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.