किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे येथे हळदा हळदीची सुवर्ण क्रांती होत आहे-खा.हेमंत पाटील.

किनवट/नांदेड:(आनंद भालेराव) मराठवाडा हा हळदीचे उत्पादन करणारा नंबर एकचा प्रदेश पण बाजारपेठ आणि व्यापारी कौशल्य नसल्यामुळे येथील शेतकरी व्हरायटी पासून कोसदुर असल्याचे चित्र आहे. यामुळे पिकते पण विकत नाही अशी मराठवाड्याची अवस्था आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे येथे हळदा हळदीची सुवर्ण क्रांती होत आहे .


या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आशेची किरण दिसून येत आहे.महाराष्ट्रातील हा पहिलाच संशोधन केंद्र स्थापन झाला असून याचा मराठवाडा सहित अखंड महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात हळद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हळद उत्पादनाच्या सर्व समस्येचे निराकरण करण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहे.
हळद केंद्राचे अध्यक्ष हिंगोली चे खासदार हेमंत पाटील म्हणाले की, राज्य शासनाकडून हळद संशोधन केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यामध्ये हळद उत्पन्नापासून तर विके पर्यंत सर्व बाबी आहेत. त्यामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबरोबरच मालाचे योग्य आणि चांगला बाजार भाव मिळण्याच्या दृष्टीने हळद संशोधन केंद्राचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण मराठवाड्यात सर्वाधिक आहे . निसर्ग, आधुनिकरण यांत्रिकरण ,अपुरे पाणी आणि सिंचन व्यवस्थापन अशा अनेक कारणामुळे इथल्या शेतीला मर्यादा येतात.
मात्र हळदीचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात होते. भारताचा हळद लागवडीत जगात पहिला क्रमांक लागतो.सध्या मराठवाड्यात राज्यातील इतर जिल्ह्यात हळद पिका खालील क्षेत्र वाढ होत आहे.
पण शेतकऱ्यांना लागवड प्रक्रियात या अनुषंगाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यात गुणवत्तापूर्ण प्रयोग मुक्त बियाण्याची अनुउपलब्धता, प्रादेशिक हवामानानुसार निर्यात प्रक्रिया, औषधे व सौंदर्यप्रसाधने इत्यादी दृष्टिकोनातून आवश्यक वाहनांची अनउपलब्धता, अयोग्य लागवड पद्धती कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, पाणी व्यवस्थापन काढणे पश्चात अपुऱ्या प्रक्रिया व साठवणूक सुविधा, विपणन व निर्यात विकास हळदीतील भेसळ प्रशिक्षण व उत्पादक विकास इत्यादीचा समावेश होतो.यासाठीच हळद संशोधन काम करत आहे.
हळद संशोधन केंद्राचे काम हळद उत्पादन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना ट्रिपलशीर, खात्याशीर व व्यवहार्य तत्त्वज्ञान उपलब्ध करून देणे, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करणे, त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे,काढणी प्रक्रिये बाबत नवीन यांत्रिकीकरणाचे संदर्भ वापरणे, हळद पॅकेजिंग, विपणान ब्रँडिंग ,निर्यात याकरिता बाजार साखळी विकसित करणे.
हळद लागवड ते विपणनाच्या अनुषंगाने शेतकरी प्रक्रियादार निराधार यांना येत असलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

शेतकऱ्यासाठी च्या सेवा बियाणे, लागवड साहित्य ,अवजारे बँक ,साठवणूक ग्रह ,वीज किरण यंत्र ,युनिट ,ड्रायपोर्ट, बियाणे चाचणी , प्रयोगशाळा उती संवर्धन माती व पाणी परीक्षण कोर कमिंग अर्क व अंश तपासणी उर्वरित कीटक बुरशी आणि तन नाशक तपासणी प्रशिक्षण आदी सूचना समस्या रोग पावसाचा इशारा सोलार ड्रायर स्लाईसर टिशू कल्चर कस्टम हायर सेंटर यादी सुविधाचा समावेश आहे.

हळदीच्या पारंपारिक ते आधुनिक उपयोग

हळदीतल्या कुर्कुमीन पासून कॅन्सर सारख्या आजारावर गोळ्यांची निर्मिती, शरीरातील जखमेवर लावण्यासाठी हळद पावडर ऐवजी ट्यूब, हळदीच्या पानाचा जंतुनाशक म्हणून वापर, हळदीचे दूध अशा अनेक उपयोग आहेत.

सौंदर्यप्रसाधने जगात एक नंबरची बाजारपेठ
असलेल्या सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा अनन्य साधारण महत्व आहे त्यासाठी कारखाने किंवा त्या पद्धतीने नुसार हळद पावडर ट्यूब क्रीम हळकुंड हळदीचे तेल आधीची निर्यात खाली पासून मसाल्याची निर्मिती यात भागधारकांचा समावेश करून भारतीय मसाल्याच्या उत्कृष्ट ते साठी पुढाकार घेणे सोईचे आहे.
मसाल्याच्या उत्कृष्टतेसाठी पुढाकार घेणे सोयीचे आहे यात हळद पावडर हळकुंड सुगंधी तेल ओली ओरिजिन निर्मिती हळदीचे लोणचे आधी बनविणे सोयीचे आहे अशा या वाढलेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी सदरील संशोधन केंद्र कार्यरत आहे.

आमच्याशी बोलताना हेमंत पाटील म्हणाले की,मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढताना मी आपल्या मराठवाड्यासहीत हिंगोली मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.
हे वारंवार आपल्या निदर्शनास आलेच आहे.
त्यातील एक म्हणजे, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत, जि. हिंगोली. या केंद्राचे काम संपूर्ण राज्यासहीत देशासाठी महत्वाचे आहे.
यातही विशेषत: आपल्या हळद उत्पादक शेतकर्यांसाठी ही गोष्ट महत्वाची आहे. जी शेती, उद्योग, व्यापार आणि रोजगार अशा सर्वच बाबतीत महत्वाची ठरते.अशा या शेतकरी हिताच्या कामाची माध्यमांनी दखल घेतली आहे.

305 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.