मयत सुरेश दत्तात्रय मस्के किनवट यांचा हमाल कॉलोनी मध्ये अपघात झाला नसुन,त्याच्या घातपातची शक्यता लोकस्वाराज्य आंदोलन कडुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी
किनवट: काल दिनांक १४/१०/२०२३ रोजीच्यां रात्रीला 11.00 च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा झुंजार पत्रकार मयत सुरेश दत्तात्रय मस्के किनवट यांचा हमाल कॉलोनी मध्ये अपघात झाला नसुन,त्याच्या घातपात घडवून आणला आहे.कारण त्यांच्या डोक्यात काही तरी तिष्ण हत्याराने वार झाल्याचे शरिराचे सुक्ष्म पाहणी केल्यानंतर लक्षात येते आहे.तेव्हा लोकस्वराज्य आंदोलन नांदेड जिल्हातील टीमनी दुपार पासुन किनवट शहरात तळ ठोकुण प्रत्येक अंगाने घटनेची पाहणी केली व स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते,पत्रकार, मित्र मंडळीना प्रत्यक्षात अप्रत्यक्षात भेट घेऊन, यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
अखेर किनवटचे पोलीस निरीक्षक मा.दीपक बोरसे यांना एका निवेदनाद्वारे उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब टिकेकर डौरकर जिल्हाध्यक्ष नांदेड कोअर कमिटी नांदेड,माणिक कांबळे लोकस्वराज्य आंदोलन जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग नांदेड, धोंडोपंत बनसोडे जिल्हाध्यक्ष नांदेड, समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पत्रकार आनंद भालेराव,नागनाथ भालेराव,अविनाश मसिदवार बोधडी,दोडके हदगाव आदींनी निवेदनाद्वारे येत्या दहा दिवसांत आरोपीला अटक नाही केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे. लोकस्वराज्य आंदोलन नांदेड जिल्हा कमिटी कडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्या नंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन श्वानपथक नांदेड येथून मागविण्यात येत आहे.अशी उशिराने माहिती मिळते आहे. मयत सुरेश दत्तात्रय मस्के यांना न्याय मिळाला पाहिजे , तसेच मयताच्या नातेवाईकांना 50 लाखाची मदत करण्यात यावी.अशी एकमुखी मागणी लोकस्वराज्य आंदोलन नांदेड जिल्हा कमिटी नांदेड जिल्हा पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे….