किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मोजे पाटोदा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी भास्कर चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश राठोड यांची निवड

किनवट प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील मोजे पाटोदा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी भास्कर चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश राठोड यांची निवड झाली आहे.

सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधितील तरतुदीनुसार किनवट तालुक्यातील मोजे पाटोदा खू येथील सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळातून सन 2022 23 ते सन 2027-28 या कालावधीसाठी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी 15 एप्रिल 2023 रोजी सहकार भवन येथे विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी भास्कर गणपतराव चव्हाण यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश नूरसिंग राठोड यांनी नामांकन सादर केले होते त्यांच्या विरोधात एकही नामांकन प्राप्त न झाल्याने चेअरमन पदी भास्कर चव्हाण तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकाऱ्यांने जाहीर केले.
या सभेला सेवा सहकारी संस्थेचे संचालक गोवर्धन राठोड, अरविंद राठोड,धरमसिंग राठोड, गणेश चव्हाण, गोवर्धन आडे,बाबुराव चपडे,सौ रेखा कराळे, सौ शोभा बटूर, रमेश शेळके, इंद्रदेव मेश्राम, राजेश बटूर हे उपस्थित होते.
या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी 2 एस एम बामणे यांनी काम पाहिले तर सचिव श्री मंडाळे यांनी त्यांना सहकार्य केले.
सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गोपीनाथ बुलबुले यांच्या नेतृत्वाखाली पी एन बटूर,लक्ष्मण राठोड, सुनील कराळे, सुनील खीसले,शिवराम राठोड, नारायण जाधव, साहेबराव बटुर आदींनी परिश्रम घेतले.

63 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.