साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील परिसरातील अतिक्रमण हटवून सुशोभिकरण करण्यात यावे -मातंग समाजाची मागणी
किनवट/प्रतिनिधी: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील परिसरातील अतिक्रमण हटवून सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी समस्त मातंग समाज किनवट तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
किनवट शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील परिसरात दुकाने, गाड्या, ऑटो, ट्रक अशा विविध प्रकारे अतिक्रमण केल्याने पुतळा दिसेनासा झाला आहे.
वारंवार निवेदन देऊनही पुतळ्याजवळील सुशोभीकरण होत नाही. तसेच या परिसरात विविध वाहने उभे असल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडून एक प्रकारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना होत आहे. हे गंभीर प्रकरण तात्काळ थांबविण्यात यावे. येणाऱ्या 25 जानेवारी 2023 पर्यंत अतिक्रमण हटवले नसल्यास आम्हाला नाईलाजास्तव 25 जानेवारी 2023 रोजी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसावे लागेल. असा इशारा समस्त मातंग समाज समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर रवी राम दिसलवार, आकाश शंकर बोलेनवार, नरेश पोषराव माहूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदरील निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी किनवट, तहसीलदार किनवट व नगरपरिषद मुख्याधिकारी किनवट यांना देऊन कळविण्यात आले आहे.