किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ध्रुवीकरणाचे राजकारण ओळखले पाहिजे..अशोकराव चव्हाण | सर्वधर्म मानवतावादी सभेत धर्मगुरूंनी दिला एकतेचा संदेश..राजेश शिंदे

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.18.कट्टरता, द्वेष आणि जातीय- धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमांतून निवडणुका जिकंण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे.

असे राजकारण नांदेडकरांनी ओळखले पाहिजे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन कॉन्सिलच्या वतीने शनिवारी दि.18नवा मोंढा मैदानात सर्वधर्म मानवतावादी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय समारोपात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते.

व्यासपीठावर सज्जादानशीन,खाँजा गरीब नवाज दर्गाह अजमेरचे अध्यक्ष हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्‍ती, तख्त सचखंड श्री हुजूर साहिबचे मीत जथेदार पंजप्यारे भाईसाहेब भाई ज्योतींदरसिंगजी,पोहरादेवी बंजारा समाज धर्मपीठाचे धर्मगुरू बलदेवजी महाराज, डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष हभप गंगाधर महाराज कुरुंदकर, मा. ष. ब्र. 108 सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज,रोहिपिंपळगाव श्रीकृष्ण मंदिर,जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कान्हेराज बाबा,मेथडिस चर्चचे अध्यक्ष रेव्हरेंड सॅम्यूयल दामले, कोलंबीचे आनंदबन गुरुगंभीरबन महाराज, नांदेडभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. बालासाहेब साजने, हजरत मौलाना मोहम्मद हुसेन खान सहसचिव ए.आय.एस.एस.सी. हैदराबाद,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डी. पी. सावंत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर,आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ.माधवराव पाटील जवळगावकर,आ.जितेश अंतापूरकर,माजी आ.ईश्‍वरराव भोसीकर,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,ॲड.सुरेंद्र घोडजकर, डॉ.श्रावण रॅपनवाड, जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,कविता कळसकर,अनिता हिंगोले, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, माजी समाज कल्याण सभापती ॲड.रामराव नाईक,स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी,मसूदखान,विरेंद्रसिंघ गाडीवाले,काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर,जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,प्रवक्ते संतोष पांडागळे,मुंतजीब,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव,शहराध्यक्ष विजय देवडे, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार,आनंद चव्हाण,सतीश देशमुख तरोडेकर,इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहरजिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस आदींची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले,की देशात हिंसा, कट्टरवाद वाढत आहे.मतांच्या ध्रुवीकरणासाठीचा हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.

पुन्हा एकदा देशात एकता, सलोखा निर्माण व्हावा यासाठी खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते.याच हेतूने काँग्रेस पुन्हा ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानातून देशाची आजची परिस्थिती लोकांसमोर मांडत असून यातून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जात-धर्मापेक्षा विचार व कामाला महत्व देणे गरजेचे आहे.

संविधानामुळेच सर्व नागरिक सुरक्षित आहेत.देशवासियांत प्रेम व सलोखा निर्माण व्हावा यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.
माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले,की भारत जोडो यात्रेचा उद्देश देशात प्रेम, सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे हा होता.

या यात्रेत सर्वधर्मिय सहभागी झाले होते. ही यात्रा सर्वधर्म समभाव यात्रा ठरली. यात्रेला देशभर प्रतिसाद मिळाला.मात्र,यशस्वीतेत नांदेड क्रमांक एक ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

*विविधतेतून एकता भारताची ओळख..रेव्हरेंड सॅम्यूयल दामले*

भारतात विविध जाती, धर्माचे लोक राहतात.विविधतेतून एकता ही आपल्या देशाची ओळख आहे. सामाजिक एकोपा राहवा यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

द्वेष,मत्सराचा त्याग करत इतरांवर प्रेम करा, यातूनच आपण यशस्वी होऊ शकतो.जीवनात अन्य व्यक्तीसमवेत भेदभाव करू नये, सर्वधर्मियांवर प्रेम करत प्रेमाचा संदेश इतरांपर्यंत पोहचवा, असे आवाहन रेव्हरंड सॅम्यूयल दामले यांनी केले.

*खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे..कान्हेराज बाबा*

‘खरा तो एकच धर्म…’ या गीतातून कान्हेराज बाबा यांनी उपस्थितांना प्रेमाचा संदेश दिला. देशात कितीही जाती असल्या तरीही स्त्री-पुरूष या दोन जाती असल्याचे त्यांनी सांगितले. इतरावर प्रेम व त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा विचार महानुभाव पंथात असल्याचे कान्हेराज बाबा यांनी सांगितले.

*मानवताच हाच खरा धर्म…सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज*

मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म आहे.
चालतानाचे पायाचे ठसे पाहून प्राणी ओळखता येतेा.मात्र, व्यक्तीच्या ठशावरून जात ओळखता येत नाही यावरून हे सर्वजण एकच आहेत. असे सांगतानाच सध्या माणुसकी दुर्मिळ होत आहे,

हे चिंताजनक असून माणुसकी आपल्यात असावी,असे आचरण सर्वांनी करावे,असे आवाहन सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांनी केले.
स्वतःचा विचार ही विकृती साजणे जीवनात प्रत्येकांनी इतरांचा विचार करत त्यांना आवश्‍यक ते सहाय्य करणे आवश्‍यक आहे. इतरांना मदत करणे ही आपली संस्कृती असून केवळ स्वतःचाच विचार ही विकृती असल्याचे डॉ. बाळासाहेब साजणे यांनी सांगितले.

*द्वेष निर्माण करणाऱ्यापासून सावध रहा..डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो*

देशात सध्या धर्म व जातीच्या नावावर द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.या प्रयत्नाला बळी न पडता सतर्क राहणे गरजेचे आहे.आजची परिस्थिती पाहता भारतीय संविधान धोक्यात येत असल्याचे चित्र आहे.

यासाठी सर्वधर्मिय जागृती होण्यासाठी अशा सर्वधर्म मानवतावादी सभा आयोजनाची गरज असल्याचे डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले.
प्रास्ताविक सुरेंद्र घोडजकर यांनी केले.सूत्रसंचालन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने जिल्हाभरातील नागरिकांची उपस्थिती होती.

*देशाच्या सलोख्यासाठी सर्व धर्मगुरूंनी एकत्र यावे..हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्‍ती*

देशात अनेक धर्म,परंपरा, बोलीभाषा वेगळ्या असल्या तरीही या देशात गंगा-जमुना परंपरा टिकून आहे.

गेल्या काही वर्षांत धर्माधर्मांत द्वेष,मत्सर पसरवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व धर्मगुरुंनी एकत्र येत यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

मोठ्या पदापेक्षा चांगले संस्कार महत्वाचे आहेत. देशात एकता,सलोखा व अखंडतेसाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करावेत,असे आवाहन हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्‍ती यांनी केले. यावेळी बलदेवजी महाराज यांनीही संत सेवालाल यांचे विचार मांडले.

डॉ.शंकरराव चव्हाणांचे स्मरण
देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी राज्य व देश पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करताना सर्वधर्म समभाव याच विचारातील त्यांची वाटचाल होती.

तीच परंपरा त्यांचे पूत्र अशोकराव चव्हाण पुढे नेत असल्याची भावना बहुतांश धर्मगुरूंनी यावेळी व्यक्त करत शंकरराव चव्हाणांचे स्मरण केले.

*कट्टरवादाला कोणत्याही धर्मात थारा नाही..भाई ज्योतिंदरसिंघजी*

सर्व धर्माची शिकवण मानवतेची आहे.

मानवतेचा अर्थ अन्य मानवाचे हित करणे,इतराचे दुःख दूर करत त्यांना आनंदी करणे असा आहे. सर्वधर्म समभाव संदेशातून खालसा पंथाची स्थापना झाली.महिलांचा आदर करा हा संदेशही यात देण्यात आला.स्वतःपेक्षा इतरांच्या हितासाठी काम करणे ही खरी मानवता आहे.

नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास हा चिंतेचा विषय असल्याचे सांगून पंचप्यारे भाई ज्योतिंदरसिंघजी यांनी जीवन जगताना आपल्या चांगल्या संस्कारातून आदर्श निर्माण करावा,असे आवाहन केले.

96 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.