किनवट नूतन गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचा शिक्षकांच्या वतीने सत्कार..
किनवट (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने आपल्या शिक्षण विभाग स्तरावरून अराजपत्रित पदोन्नती मुख्याध्यापक यांना बढती देऊन महाराष्ट्रातील पंचायत समिती शिक्षण विभागातील रिक्त गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती आदेश नुकताच देण्यात आला. याच आदेशान्वये किनवट पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये ज्ञानोबा रामनाथ बने यांनी नूतन गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज स्वीकारला.नूतन गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये केंद्रप्रमुख साधन व्यक्ती व शिक्षकांच्या वतीने जाहीर स्वागतसत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड,केंद्रप्रमुख रमेश राठोड,केंद्रप्रमुख रामा उईके,पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक जुगनूसिंग दीक्षित,विषय शिक्षक रवी नेम्मानिवार,पंचायत समिती समन्वयक उत्तम कानिंदे सहशिक्षक मारोती भोसले,गोपाळ कनाके,विनोद पांचाळ, व्यंकटेश शरलावार तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग साधनव्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते.
नूतन गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने मु.पो.ढाळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत त्याच्या मुळ गावी झाले. लहानपणापासून शिक्षणाबरोबर क्रीडा ची आवड जोपासत त्यांनी 1987 मध्ये संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय धामणगाव ता.शिरूर आनंतपाळ जि.लातूर येथे एक वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी बिएड शिक्षण पूर्ण केले त्यानंतर सन 1989 ते 1992 दरम्यान रवींद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथे माध्यमिक गणित शिक्षक म्हणून सेवा बजावली खाजगी अनुदानित शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतानाच 11 मार्च 1992 रोजी जिल्हा परिषद प्रशाला अंदोरी ता.अहमदपूर जि. लातूर येथे रुजू प्रथमतः जिल्हा परिषदेच्या शाळेत नेमणूक झाली.आणि याच शाळेवर त्यांनी 11 मार्च 1992 ते 31ऑक्टोबर 2006 पर्यंत माध्यमिक शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले. त्यानंतर 1नोव्हेंबर 2006 रोजी अराजपात्रित पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद कन्या प्रशाला, चाकूर जि. लातूर येथे आजतागायत मुख्याध्यापक म्हणून कार्य करत असतानाच शासन शासनादेशानुसार त्यांना नूतन गटशिक्षणाधिकारी किनवट म्हणून पदभार मिळाला आणि नुकतेच गेल्या आठवड्यामध्ये ज्ञानोबा बने यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, किनवटचा पदभार स्वीकारला.मनाने खूप प्रांजळ,प्रामाणिक, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष,कार्यतत्पर, मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची खाती आहे. एक उत्कृष्ट क्रीडापटू,क्रीडाशिक्षक, क्रीडा खेळाडू म्हणून संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये आजपर्यंत 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय कबड्डी खेळाडू त्यांनी घडवले आहेत. त्याचबरोबर असंख्य डॉक्टर,इंजिनियर, नगरपालिका सीईओ अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांचे विद्यार्थी आहेत. नवोदय,शिष्यवृत्ती परीक्षा पर्यवेक्षक प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कबड्डी,खो-खो,बुद्धिबळ तसेच हॉलीबॉल चे उत्कृष्ट खेळाडू आहेत. क्रीडा बरोबर सुंदर हस्ताक्षर यावर सुद्धा त्यांचा जास्त भर आहे. येणाऱ्या काळात किनवट आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक अनेक स्पर्धा व संधी उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा लातूर पॅटर्न ओळख असलेला लोकसहभागातून शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण करणे अर्थात BALA उपक्रम किनवट तालुक्यात राबवून विद्यार्थ्यांचा शालेय,क्रीडा,शैक्षणिक सर्वांगीण विकास करणार असल्याचे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.