राजमाता मॉं जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती किनवट येथे उत्साहात साजरी
किनवट/ प्रतिनिधी: राष्ट्रमाता, राजमाता मॉं जिजाऊ साहेब यांची जयंती जिजामाता चौक किनवट येथे उत्साहातसाजरी करण्यात आली.
आमदार भीमराव विराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार हेमंत पाटील यांच्या किनवट येथील संपर्क कार्यालय येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉं साहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शहर प्रमुख सुरेश सातूरवार मारुती सुंकलवाड, संजय मुरगुलवार, सुरेश घुमडवार, रवी नेमानीवार,हनुमंता मुकाडे, अश्विन राठोड, अशोक जाधव, भारत राठोड, अनिल भोयर ,अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे ,सुरेश साकपेलीवार ,ज्ञानेश्वर पेंढारे, अमोल सूर्यवंशी, किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनील गरड आदी उपस्थित होते.