इंजेगाव फाट्यावरील मटका अड्डयावर किनवट पोलिसांची धाड; तिघा सह मुद्देमाल व साहित्य जप्त.
किनवट/प्रतिनिधी:
किनवटहुन 24 किमी असलेल्या बहुचर्चित इंजेगाव फाट्यावरील मटका अड्डा हा तेलंगणाच्या सीमेवर कोरोना काळातही बिनधास्तपणे चालू होता या बुक्की वर डीवायएसपी तसेच स्थानिक पोलिस संच या पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून 3 जुगारी 2 दुचाकी व काही रक्कम जप्त करण्यात आल्याचे समजते. किनवट पोलीस ठाण्यातील इंजेगाव नाका येथे बिट जमादाराच्या अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे गेल्या कित्येक दिवसापासून मटका क्लब सह, अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे. लॉक डाऊन च्या काळात डीवायएसपी मंदार नाईक यांच्या पथकाने सदर बुक्की वर धाड मारून मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतरही याठिकाणी ओपन-क्लोज मटका व इतर अवैध धंदे सुरूच होते. डीवायएसपी मंदार नाईक यांच्या पथकासह पोलीस निरीक्षक राहुल भोळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी बुक्की वर धाड टाकली. पोलीस आल्याची कुणकुण लागताच काही जुगारी फरार झाले. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत मटका खेळणाऱ्या तसेच खेळविणाऱ्या तिघा सह 2 मोटारसायकली जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. नोंदीसाठी इंजेगावात फाटा बुक्की वर धाड पडली असली तरी किनवट तालुक्या सह शहरात मुख्य बुक्की सह गल्लीबोळातील बुक्कीवर पोलीस केव्हा धाड टाकतील किंवा नांदेड एलसीबी केव्हा लक्ष घालतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
किनवट तालुक्यातील जागोजागी सुरू असलेल्या मटका-जुगारामुळे अनेक गरिबांची घरे उध्वस्त होत आहेत.या प्रकरणात लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित करावे अशी तालुक्यातील जनतेची मागणी समोर येत आहे.