किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न राहणार-रामदास पाटील सुमठाणकर (कपिलधार धर्मसभेत प्रतिपादन) –

बीड :-राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी सुरूवात केलेली कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाची भव्य धर्मसभा संपन्न झाली. ही धर्मसभा समस्त पदयात्रा मठ संस्थान बिचकुंदा यांनी प्रति वर्षाप्रमाणे आयोजित केली होती.यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रामदास पाटील यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या वर्तमान स्थिती बद्दल अभ्यासपूर्ण मांडणी केली व वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न आवश्यक असल्याचे मत मांडले.
वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे बोलले. आपण हि समाजाचे काही देण लागतो,यां यभावनेतून निरपेक्ष वृतीने,समाजाच्या भल्यासाठी आपसातील मतभेद सोडून एकत्र यावे असेही अहवान केले.

यावेळी धर्मपिठावर नांदेडचे खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर यांनीवीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ष ब्र 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, उपाध्यक्ष ष ब्र 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम मांजरसुबा, ष ब्र 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ, ष ब्र 108 सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा,ष ब्र 108 रायपटनकर महाराज, ष ब्र 108 मलायगिरी महाराज, लातूर भाजपा अध्यक्ष गुरुनाथ मगे, हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे देवगिरी प्रांत संयोजक नितीन शेटे, बस्वराज मंगरूळे, उदय चौडा, मनोहर भोसीकर, कीर्तनकर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष शिवाराज नावंदे गुरुजी,श्री विजय धोंडगे, इत्यादी मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, प्रत्येक जिल्ह्यात तरुणासाठी निवासी वसतिगृह, मंगळवेढा येथे शासनाने जागा संपादित करून भव्य स्मारक उभारणे, कीर्तनकार प्रवचनकार,
पुरोहित, पुजारी जंगम,गायक वादक यांना मासिक वेतन,या समाजातील मठ संस्थानांना संरक्षण देणे आणि मालमतेच्या संरक्षणार्थ स्वतंत्र प्राधिकरण नेमणे, सोलापूर विद्यापीठाच्या धर्तीवर सर्व विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करणे, वीरशैवातील मन्मथस्वामी,लक्ष्मण महाराजांसह अनेक संतांचे ग्रंथ, अभंग, गाथा आणि अनेक शरनाचे वचन साहित्याचा शोध घेऊन संग्रहीत करणे आणि संशोधन करणे, केंद्रशासनाच्या प्रशाद योजनेअंतर्गत सर्व मठाचे जीर्णोद्धार करणे, प्रत्येक गावात स्वतंत्र स्मशानभूमी आणि स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण मुक्त करणे, आणि महत्त्वाचं म्हणजे वीरशैव लिंगातील सर्व पोटजाती ह्या इतर मागासवर्गीय(obc ) संवर्गात वर्ग करणे, जंगम मधील बेडा जंगम, बुडगा जंगम इत्यादी पोट जातीतील तांत्रिक अडचणी दूर करून जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे इत्यादी अशा अनेक मागणीबाबत तात्काळ शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे बोलले.मा देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे विशेष बैठक लावून वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचही सांगितले. तसेच आपला धर्म हा हिंदू धर्म असुन, हिंदुवाची कास धरून समाजाने संघटित व्हावे असेही बोलले. समाजात अनेक संघटना आहेत त्यांचं ही समाजासाठी उपयुक्त काम आहॆ असं सांगून काही विघातक प्रवृत्ती नक्कीच दूर व्हाव्यात असेही बोलले. समाजाने काळानुसार स्वतः मध्ये बदल करून स्वतःचे सामर्थ्य वाढवलं पाहिजे असे ते बोलले.

140 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.