किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

उत्तम व्यवसाईक, समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये आवगत करणे गरजेचे ; अॅड. मिलिंद सर्पे

किनवट,९ : व्यवसाईक व समाजकार्यकर्ता बनण्यासाठी बातमी लिहीण्याचे कौशल्ये अवगत करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन पत्रकार अॅड. मिलिंद सर्पे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे (कै.) उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात, शनिवारी(दि.८) संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळा पार पडली.यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षीय समारोह प्रसंगी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले म्हणाले की, अँड. सर्पे यांनी समाजकार्य कौशल्ये प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन केंद्रातील सर्व समाजकार्य प्रशिक्षणार्थीना बातमी लिहीण्याचे कौशल्ये शिकविले आहे,ते केंद्राचे विद्यार्थी आत्मसात करतील.
सुरुवातीला समाजकार्य कौशल्ये प्रयोग शाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत इंगोले यांचा सत्कार समाजकार्य प्रशिक्षणार्थी शेख अर्षद यांनी केले. प्रमुख साधन व्यक्ती अँड. मिलींद सर्पे यांचा सत्कार संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. उमाकांत इंगोले आणि समाजकार्य प्रशिक्षणार्थी माजळकर कानुपात्रा यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकार्य प्रशक्षिणार्थी पवार सचिन यांनी केले, तर पेंदोर आशा हीने आभार मानले.
ही प्रयोगशाळा यशस्वी करण्यासाठी माजी समाजकार्य प्रशिक्षणार्थी रविंद्रनाथ गुंडेवाड, भोपे उषा, जाधव प्रणिता, कोल्हे दीपक, राठोड कृष्णवेणी, सय्यद जीशन, डुडूळे प्रियंका, राउत अंकेत आणि तोडसाम सोनाली यांनी पुढाकार घेतला.
ही प्रयोगशाळा आयोजित करण्यासाठी विद्यापीठाचे कुलुगुरु प्रा. डॉ. उध्दवराव भोसले सर, प्रकुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे प्राध्यापक व संचालक डॉ. घन:श्याम येळणे , संशोधन केंद्राचे सह – समन्वयक डॉ. गोवर्धन लांब, डॉ. योगेश आंबुलगेकर आणि डॉ. शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

68 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.