जि.प.हा.मांडवी येथे पो.स्टे.मांडवी कडून शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांनी, महिला सुरक्षा विषयक जनजागृती शिबिर.
मांडवी/प्रतिनिधी: आज दिनांक ०५/०८/२०२३रोजी सकाळी ठिक १२-००वाजता मांडवी पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री मल्हार शिवरकर साहेब यांनी मांडवी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालया पाठोपाठ जि.प.हा.माडवीत बाहेर गावाहून/ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सायकल,अॅटो ,व इतर वाहणाने दररोज येणं जाणं करित असतात.
सदर शालेय किशोरवयीन विद्यार्थ्यांनी ना नाहक काही चीडीमार, व्यक्ती, तरूण, सुशिक्षित बेकार, किंवा इतर व्यक्ती कडून जाणूनबुजून त्रास दिल्या जातो.
तेव्हा त्यांच्या जाचातून सुटका, सुरक्षा साठी शासनाने अनेक प्रतिबंधात्मक कायदे केलेले आहे.
याची जाणीव -जाग्रती, किशोरवयीन मुलींसह सर्वच महिलांना व्हावी.यास्तव संपूर्ण माहिती आपल्या जनजागृती शिबिरात दिली.आज महिलांना भरपूर प्रमाणात शिक्षण असून सुद्धा लोक लज्जास्तव महिला/मुली बदनामी च्या भीतीने अन्याय सहन करित राहतात.
अशा वेळी विद्यार्थीनी, महिलांनी घाबरून न जाता वेळीच पोलिस स्टेशन अंतर्गत ११२या मोबाईल नंबर वर २४तास कधीही फोन लावावे, केवळ अर्ध्या तासाच्या आत आपण ज्या ठिकाणी आहात.त्याठिकाणी आम्ही, आमचें पोलिस मदतीला पोहचेल.व महिलांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.व आपणास होणार्या संभाव्य धोक्यातुन वाचवून सुरक्षा पुरवण्यात येईल.
११२ हा मोबाईल नंबर आपण कधीही लावा पण चुकीच्या पद्धतीने काही कारण नसताना लावला गेल्यावर पोलिसांचे विश्वास गमावून बसाल.अशा चुकीच्या पद्धतीने फोन करणार्या स्त्रियांवर गुन्हा दाखल करण्यात येतो.
या मोबाईल नंबर व्यतीरीक्त माझे/पो.स्टे.नंबर सुध्दा आपणांस देण्यात येईल.न घाबरता तुमच्या शेजारी,घरी,आई-वडीलांना माहिती सांगावी.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आपली मदत, सुटका, सुरक्षा करण्यास आम्ही,आमचें पोलिस नेहमी च तत्पर आहे.
कशी भरीव माहिती आज मा.मल्हार शिवरकर साहेब यांनी प्रस्तुत शिबिरात दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पी.बी.जाधव, महिला शिक्षक श्रीमती वैशाली बोड्डेवार, श्रीमती उमरे मॅडम, श्रीमती झाडे मॅडम, सहशिक्षक दिलीप मांडण, देविदास पवार, प्रवीण गवळी, पंडित प्रधान, दयानंद वाकुरे,श्री मनोज कापसे, मनोहर आडे,श्री सुतारे सर, शिक्षण समिती सदस्य दासू बैमुतकूलवार इत्यादी जण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रविंद्र वाडगुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री दिलीप मांडण यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव पी.बी.हे होते.