अग्रिपथ योजने विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यलया समोर डी.वाय.एफ.आय ची निदर्शने
*लष्कराचे कंञाटीकरण करणारी योजना वापस घेण्याची आग्रही मागणी*
किनवट :
अग्रनिपथ योजने विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत असतांना शहरात उपविभागीय अधिकारी कार्यलयावर डेमोक्राॅटीक युथ फेडरेशन आॅफ इंडिया आणि स्टुडंस फेडरेशन आॅफ इंडिया या युवा विद्यार्थी संघटनेच्या वतिने निदर्शने करण्यात आली.
केद्रं सरकार कडून अग्रनिपथ अग्रनिवीर हि योजना जाहिर करण्यात आली आहे,जी की युवा विरोधी आणि देशाच्या सुरक्षाविरोधी आहे,देशात सगळ्याच क्षेञात मोठ्या प्रमाणात कंञाटीकरण सुरु असतांना ती पद्धशीरपने लष्करात मागच्या दाराने अण्याचा कुटिल डाव केद्रं सरकार करत आहे.चार वर्षाच्या सेवेनंतर फक्त २५% युवकांना सेवते संधी मिळणार असून ७५% तरुन हे पुन्हा बेरोजगारीच्या खाईत ढकलेले जाणार आहेत. निर्वति वेतन,पेंशन वर होणारा खर्च टाळण्यासाठी हि योजना आणली गेली असण्याचा आव आणुन लष्कराचे कंञाटी करण करण्याचा हा कुटिल डाव आहे.अग्रणिपथ योजना रद्द करुन पुर्वरत सैन्य भरती सुरु करा,केद्रं आणि राज्य सरकारच्या विविध विभागात १७ लाखाहुन अधिक रिक्त जागा तातडीने भरा, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी डी.वाय.एफ.आय च्या वतिने उपविभागीय अधिकारी कार्यलया समोर शांतिपूर्ण निदर्शने करुन मा.सह्याक जिल्हाधिकारी किर्तिकिरन पुजार साहेबांना निवेदन देण्यात आले.या वेळी डी.वाय.एफ.आय चे जिल्हा सचिव स्टॅलिन आडे,जनार्दन काळे, अमोल आडे,बाणा कोतुरवार, महेमुद पठाण,शेख फरीद शेख बाबा,आशीष भवरे,अमोल आञाम,सचिन बोबंले,निलेश जाधव, मनोज सल्लावार, नंदकुमार मोदुकवार आदी उपस्थित होती.
लष्कराचे कंञाटीकरण करणारी योजना रद्द करा,इंकलाब जिंदाबाद च्या घोषनांनी या वेळी युवा कार्यकर्तेनीं परीसर दाणादुन सोडले.