नांदेडचा कायापालट करणाऱ्या विकास कामांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
नांदेड, (जिमाका) दि. 28 :- नांदेड महानगरातील वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते व इतर आवश्यक सोई-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे विविध विकास कामांचे आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन समारंभास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, संतबाबा बलविंदरसिंघजी, डॉ. मिनलताई खतगावकर, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, बर्की चौक, महाराणा प्रताप चौक सिडको, छावा चौक कौठा येथे भूमिपूजन करण्यात आले. लातूर फाटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते ढवळे कॉर्नर व महाराणा प्रताप चौक सिडको ते हडको पाण्याची टाकी, उस्माननगररोड लिंक रस्त्याचे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा केली जाणार आहे. रवीनगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी ते साई कमान ते वसरणी येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मुथा चौक-महावीर चौक-गुरुद्वारा चौक (देनाबॅक चौक)-जुना मोंढा-बर्की चौक-पहेलवान टी हाऊस-देगलूरनाका येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ-महात्मा गांधी पुतळा-फॉरेस्ट ऑफीस चौक-गुरुद्वारा गेट नंबर 1 ते रणजीतसिंह मार्के (स.भगतसिंग चौक)-केळी मार्केट चौक-कब्रस्तानच्या घर बाजूने उर्दू घरापर्यंत सी.सी. रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली गेट आरोबी-यात्री निवास पोलीस चौकी-फॉरेस्ट ऑफीस ते महावीर चौक-मल्टीपर्पज हायस्कूल ते बंदाघाट लिंक सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे या कामांचा विकास कामात समावेश करण्यात आलेला आहे. या कामांमुळे नांदेडकरांच्या जनजीवनास व वाहतुकीस मोठा लाभ होईल.
000000