जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र जिल्हा नांदेड,किनवट द्वारे भव्य रॅली व सभेचे समापन.
किनवट/प्रतिनिधी: स्वातंत्र्या पासूनच विविध प्रलोभने व आकर्षण यांना बळी पडून , कधी कधी बळाचा वापर करून व फसवणुकीच्या, अंधश्रद्धा च्या मार्गाने आदिवासी बांधवांचे धर्मांतरण केले जाते. असे आदिवासी बांधव कालांतराने आपली मूळ परंपरा चालीरीती भाषा देवी-देवता यांच्यापासून दूर जातात
अनुसूचित जमातीच्या (एसटी )समाजातील जी व्यक्ती व लोक आपल्या मूळ आस्था परंपरा व सनातन वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा त्याग करून दुसऱ्या म्हणजे परधर्मात (ख्रिश्चन,मुस्लिम) धर्मांतर करून जात आहे व तेथील लाभ घेत आहे आणि असे असून देखील अजून पर्यंत आदिवासींचे आरक्षण, सरकारद्वारा मिळणाऱ्या सोयी-सुविधा ,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून गैरफायदा घेत आहेत अशा लोकांना आरक्षण मधून बाहेर काढण्यात यावे. या सभेत आग्रह करण्यात आला की अनुसूचित जनजाती आदेश 1950 मध्ये सुधारणा करून अशा दुहेरी लाभ ेणार्याचे नाव यादीतून काढून delisting करावे.
, जेणेकरून आरक्षण त्याच्या मूळ दावेदारांना मिळेल.
या साठीच जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र जिल्हा नांदेड, किनवट आयोजित जनजाती आदिवासी रॅली व महासभा 23 मे रोजी कलावती गार्डन येथे आयोजित केली होती. ह्या विषयासाठी म्हणून रॅली भगवान बिरसा मुन्डा चौक ते शहराच्या मुख्य मार्गवरुन निघून शेवटी कलावती गार्डन येथे महासभा झाली. ह्यात व्यासपीठ वर ह. भ. प शिर्डे महाराज मोहपुरकर व श्री विनायक महाराज कोडापे, श्री वासुदेव कुमरे महाराज श्री डॉक्टर उत्तमजी धुमाळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री आ. भंगतसिहजी नैताम ,मध्यप्रदेश व कार्यक्रमाचे स्वागताअध्यक्ष श्री मा. आ. भिमराव जी केराम साहेब संयोजक श्री दत्ताजी आडे सह संयोजक श्री गजानन डवरे व श्री अर्जुन लांबाटे आयोजन समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.