किनवट शहरातील बालाजी मंदिरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
किनवट/प्रतिनिधी: शहरातील बालाजी मंदिरात भगवान परशुराम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बहुसंख्येने ब्रह्म वृद्धांनी सहभाग नोंदविला होता.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी भूषविले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, अभय महाजन,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, रामराव पत्की, दासू वैद्य गुरुजी, गजानन लाटकर गुरुजी यांचीउ पस्थितीहोती.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाचे प्रश्न असो व विविध मागण्या त्या सोडविण्याकरिता आम्ही सदैव सक्रिय आहोत तर ब्राह्मण समाजाने इतर समाजाच्या कल्याणाकरिता सदैव प्रयत्न केले आहेत. तसेच ब्राह्मण समाजाच्या कोणत्याही कार्यामध्ये सदैव लोककल्याण हेच ध्येय असते. तर श्रीनिवास नेमानीवार यांनी बोलताना सांगितले की, ब्राह्मणांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणतेही राजकारण पूर्ण होत नाही परंतु हे ब्राह्मणांचा गैरवापर करतात असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भगवान परशुराम जयंतीनिमित्त पत्रकार प्रदीप वाकोडीकर व प्रमोद पोहरकर यांच्या प्रयत्नांतून साकार झालेले दैनिक देशोन्नती विशेषांक प्रकाशित करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी भगवान परशुराम संत साहित्य, समाजातील आज ब्राह्मणांची स्थिती, संस्काराची समाजाकरिता गरज इत्यादी बाबीवर विस्तृत भाष्य केले व आपले परखड मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश भिलवडी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर पत्की यांनी मानले.
आयोजित कार्यक्रमात ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारणी एकमताने घोषित करण्यात आली. ज्यामध्ये पत्रकार आशिष देशपांडे यांची किनवट तालुका ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली. तर सामाजिक कार्यकर्ते कचरू जोशी यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली.
आगामी काळात विस्तृत कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असेही नवीन नियुक्त अध्यक्ष आशिष देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
उपस्थित ज्येष्ठ ब्रह्मवृंदानी नवीन युक्त कार्यकारिणीचा सत्कार केला. तर मावळते अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वाकोडीकर यांनी नवनियुक्त अध्यक्ष आशीश देशपांडे यांच्याकडे पदभार सोपविला. आयोजित कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील प्रतिभावंताचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये अल्पावधीत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली सारंग वाकोडीकर, शिक्षणक्षेत्रातील प्राध्यापक सदाशिव जोशी, पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल अशिष देशपांडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी रेणुकादास पांडे, नारायण चमनवार, प्राध्यापक राजेश जोशी, प्राध्यापक सुहास कुलकर्णी, प्राध्यापक रेणुकादास बोरकर, नागेश वैद्य, प्रा योगेश वैद्य, दिनेश पाटील, प्रा परशुराम जोशी, सचिन कत्रे, गणेश शर्मा, राहुल नेरलकर, सुनील चांदुरकर, गजानन कोत्तावार, बंडू पांडे, अभय चौधरी, पवन गुरु पाटील, सौ. लाटकर ,सौ.जया कोटावार, श्रेयश माडपेल्लीवर ,मयुरेश रवींद्र चौधरी, कृष्णा देशपांडे, प्रधुण्य जोशी आदि जण उपस्थित होते,