आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आदिवासीं रत्न नारायण सिडाम यांचा 71वा वाढदिवस आज गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
किनवट प्रतिनिधी: किनवट सारख्या ग्रामीण भागात बहुजन चळवळीच्या माध्यमातून निस्वार्थपणे जनसेवा करणारे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आदिवासीं रत्न नारायण सिडाम यांचा 71वा वाढदिवस आज गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लोकनेते शिवाजीराव मोघे हे होते तर प्रमुख अतिथी आमदार भीमराव केराम,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे,दादाराव टारपे,जि.प.माजी अध्यक्षा जनाबाई डुडुळे,माजी नगराध्यक्ष माजीनगराध्यक्ष सरदार खान,राघू मामा,माजी नगराध्यक्ष यादवराव नेम्मानिवार,सोखी,के.मूर्ती,डॉ. अशोक बेलखोडे, गंगारेड्डी बैंमवार,दादाराव कायापक,रामदास कनाके, शिवसेना प्रमुख बालाजी मुरकुटे आदी मंचकावर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या व निमंत्रित पाहुणे मंडळीच्या समक्ष नारायणराव सिडाम यांनी केक कापला. तसेच शॉल, श्रीफळ व पुष्पहाराने मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
अनेकांनी सिडाम यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना दीर्घायुष्य लाभो आशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मंत्री माननीय शिवाजीराव मोघे म्हणाले की, नारायणराव सिडाम यांनी किनवट पुरतेच कार्य केले नाही तर प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पर्यायाने मोर्चे काढून समाज उत्थानाचे कार्य केले .परंतु राजकीय क्षेत्रातून त्यांना मिळावीत असे मोठी पदे मिळाली नाहीत. परंतु ते नाराज न होता आतापर्यंत समाजाचे व इतर सर्व क्षेत्रात कार्यासाठी अग्रेसर आहेत.
आमदार भीमराव केराम यांनी नारायणराव सिडाम यांचे बालपणापासून आजपर्यंतच्या कार्याची माहिती सांगितली. ते म्हणाले की, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नारायण सिडाम हे मागील कित्येक वर्षापासून किनवट सारख्या आदिवासी दुर्गम मागास भागात निस्वार्थपणे जनसेवा करत आहेत. बहुजन चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान असून शोषित पीडित समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यभरात अनेक मोठमोठी आंदोलने केली आहेत कायम जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या हितासाठी कार्यरत आहेत.
त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. किशन मिरासे गोपीनाथ बुलबुले गोपाल कनाके यांनी केले होते.तर कार्यक्रमाचे संचालन मारोती सुंकलवाड यांनी केले.