तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) च्या मौजे कोठारी ते हिमायतनगर या टप्प्यातील काम रेंगाळल्याने तिव्र जनआंदोलन उभारण्याचा जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचा इशारा
किनवट ता.प्र दि १७ तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) च्या मौजे कोठारी ते हिमायतनगर या टप्प्यातील काम रेंगाळल्याने बोधडी, जलधारा, कोठारी, गोकुंदा या भागातील नागरीक व किनवट ते नांदेड मार्गावर प्रवास करण्याच्या नागरीकांना गेल्या ४ वर्षापासुन अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरीकांच्या संयमाचा बांध आता संपुष्टात येत असुन या विरुध्द आगामी काळात तिव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी दिला आहे.
बोधडी, चिखली, दहेगाव, टिंगणवाडी, लहान बोधडी, पार्डी, जलधारा या भागातील नागरीकांना अत्यंत तिव्र स्वरुपाची समस्या यामुळे भेडसावत असुन त्यांच्या वाहनांचे लहान मोठे अपघात होऊन अपंगत्व येणे व एखाद्यावेळी जिव देखिल गमवावा लागत आहे. यामुळे किनवट तालुक्यातील मौजे कोठारी ते हिमायतनगर या टप्प्याचे या राष्ट्रीय महामार्गाचे काम तत्काळ मंजुर निविदे नुसार, मंजुर लांबी व रुंदीचे करण्यात यावे या करिता रस्त्यावर उतरुन आगामी काळात राष्ट्रीय महामार्ग अथोरिटी कडे पाठपुरावा करणार असुन वेळ पडल्या या मार्गावरील वाहतुक बंद पाडण्याचा इशारा देखिल जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी दिला आहे.
बोधडी परिसरातील युवक बालाजी नागरगोजे या युवकाचा मृत्यु झाल्याने त्याचे संपुर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे, याला सर्वस्वी जबाबदार या मार्गाचे काम करणारा कंत्राटदार असुन त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करुन त्यास १० लक्ष रुपयाची मदत शासनाने करावी कारण कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे रात्रीच्यावेळी रस्ता कोणत्या दिशेने चालु आहे याचा अंदाज न आल्याने दुधगाव जवळच्या पुलातील खड्ड्यात पडुन सदर युवकाचा मृत्यु झाला आहे. अशा स्थितीत संबधित कंत्राटदाराने दिशादर्शक फलक लावणे, सुचना लावणे आवश्यक असतांना त्याने तसे न लावल्याने नाहक बळी गेला आहे तर मागील ४ वर्षात ज्या ज्या नागरीकांचा बळी गेला या रस्त्यावरील अपघातामुळे त्यांना ही या कंत्राटदाराच्या देयकामधुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी हि मागणी दिनकर दहिफळे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या मौजे कोठारी ते हिमायतनगर पर्यंतचे कंत्राटदार हे कामाच्या सुरवातीपासुनच बदनाम असुन त्यांच्या सुमार दर्जाच्या कामामुळे नागरीकांना अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकुन त्याचे काम इतर कंत्राटदाराला वर्ग करण्यात यावी हि मागणी या भागातील नागरीक केल्या अनेक महिण्यापासुन करत आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग अतोरिटी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरीकांचा नाहक जिव जात आहे.