सीताफळ देण्याच्या बहाण्याने केला लैंगीक अत्याचार* *विशेष न्यायालयाने दिली ७५ वर्षीय वृध्दास ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.जिल्यातील किनवट तालुक्या मधील पोस्टे मांडवी हद्दित राहाणारे पिडीत मुलीचे आई-वडील उस तोडीचे कामाला कर्नाटक राज्यात गेल्याने पिडीत मुली सोबत तीची आजी राहात होती.सदर मुलीस शेजारी राहाणारे किशन बुड्डा याने सिताफळाचे आमीष दाखवुन लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार तीचे आजीने दिली होती.
त्यावरुन पोस्टे मांडवी गुरन ७५/२०१९ कलम ३७६ (अ) (ब) भादवि सह कलम ४,६ पोस्को कायदा नुसार दिनांक १५.११.२०१९ रोजी आरोपी नामे किशन धर्मा मुनेश्वर, वय ७५ वर्षे, रा……. ता.किनवट यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक भोकर श्री. विजय पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग माहूर श्री.विलास जाधव,या अधिकाऱ्यांनी भेट देवून तपासा बदल योग्य त्या सुचना दिल्या होत्या. त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष केंद्रे, व रायटर पोकॉ/२८५१ वैजनाथ मोटरगे, ने. पोस्टे मांडवी यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन सदर आरोपी विरुध्द सबळ पुराव्यानिशी विशेष न्यायालय,नांदेड येथे आरोपपत्र दाखल केले होते.त्याचा पोक्सो सत्र खटला क्रमांक ०८/२०२० असा होता.
सदर खटल्यात न्यायालयाने आरोपीस अटक झाल्यापासुन जामीन दिला नाही.सदर खटल्यात सरकार पक्षाची बाजु सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. ए. बत्तुला (डांगे) मॅडम यांनी सक्षमपणे मांडली असुन सदर खटल्यात एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले होते.उपलब्ध पुराव्या आधारे मा.न्यायाधीश रविंद्र पांडे विशेष न्यायालय, नांदेड यांनी आरोपीस दोषी ठरवुन ३ वर्ष सक्तमजुरी व २,०००/ रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
पोस्टे मांडवीचे सपोनि श्री मल्हारी शिवरकर,यांचे मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणुन पोकों/३३७२ शेख खदीर यांनी काम पाहिले. श्री. प्रमोद शेवाळे,पोलीस अधिक्षक नांदेड,श्री.विजय कबाडे,अपर पोलीस अधिक्षक भोकर,श्री.निलेश मोरे,अपर पोलीस अधिक्षक नांदेड,श्री. विलास जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी माहुर यांनी तपास टिम सपोनि श्री संतोष केंद्रे, पोउपनि शिवप्रसाद कन्हाळे, पोलीस अंमलदार वैजनाथ कोर्ट पैरवी पोकॉ/३३७२ शेख खदीर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.