भारतीय संविधान दिन सामाजिक समरसता मंच किनवट च्या वतीने साजरा
किनवट (शहर प्रतिनिधी) भारतीय संविधान दिन सामाजिक समरसता मंच किनवट च्या वतीने बळीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7-०० वाजता साजरा करण्यात आला .संविधान ग्रंथाचे पूजन या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद सोनटक्के यांनी केले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला रमेश आंधळे ,सखाराम घुले पांडुरंग चव्हाण, रमेश मुडकर, उत्तम पवार, विमर्श विनोद पाटील, संस्कार नागनाथ बस्वादे ,केशवजी लांडगे , मनोहर तेलंग,नागनाथ बस्वदे,शंकर जाधव ,श्याम राठोड ,विठ्ठल झाडे,दूधराम आडे यांची उपस्थिती होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील आतेरीकी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
158 Views