खावटी योजनेमुळे आदिवासी बहुल गावांना मिळणार संजीवनी – खासदार हेमंत पाटील चार तालुक्यातील ९ हजार ४७१ अर्ज मंजूर
किनवट (आनंद भालेराव)
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील किनवट तालुक्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी खावटी अनुदान योजना खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतली आहे . तालुक्यातील आदिवासी गावांना यामुळे संजीवनी मिळणार आहे . हिंगोली लोकसभा मतदार संघातील चार तालुक्यातील ९ हजार ४७१ आदिवासी कुटुंबाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने शेतकरी, आर्थीकदृष्टया दुर्बल व अनुसुचित जमातिच्या कुंटूबियांना आर्थीकसाह्य देण्याची सवेदनशिल भुमिका घेतलेली आहे,त्याचाच एक भाग म्हणुन दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही म्हणुन आर्थीक विवंचनेतुन अनुसुचित जमातिच्या कुंटूबियाची उपासमार होऊ नये म्हणुन सन,१९७८ पासुन खावटी कर्ज योजना राज्य शासनाकडुन सुरु करण्यात आली,आहे. परंतु मागील काही वर्षांपासून हि योजना बंद करण्यात आली होती. सध्या कोरोना विषाणूच्या काळात ग्रामीण भागातील आदिवासी समाज रोजगाराअभावी हवालदिल झाला आहे. त्यांना संजीवनी देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदिवासी मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हि योजना मंजूर करून घेतली आहे . राज्यातील ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून एकूण ४ हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये २ हजार रुपये किमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू आणि दोन हजार रुपये रोख रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यस्तरावर सुमारे ४८२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत . हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये किनवट , माहूर, आणि हदगाव , हिमायतनगर तालुक्यांचा समावेश होते. किनवट तालुक्यामधून या योजनेसाठी सर्वाधिक ५ हजार १२७ अर्ज पात्र ठरले आहेत . त्याखालोखाल माहूर तालुक्यात १ हजार ७७२ , हदगाव तालुक्यात १ हजार ७६५ हिमायतनगर तालुक्यात ८०७ अर्जदारांना या योजनेचा लाभ होणार आहे.