वानोला जि.प.गटात किशोर पवार पाटील ताकतीने निवडणूक लढविणार!
माहूरगड: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका अवघ्या कहीं महिन्यावर येऊन ठेपल्याने किनवट व माहूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल याची उत्सुकता आतापासूनच मतदारांमध्ये लागली आहे.
वानोळा जि. प. गट कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार यावर सर्वांचे उमेदवारी अवलंबून असली तरी आजच्या घडीला अनेक प्रवर्गातून सर्वच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची वाट पाहत आहेत व मी कसा चांगला उमेदवार ठरेल याची चाचपणी मतदारांकडून करत आहेत.
यात काँग्रेस कडून संजय राठोड,किसन राठोड, शिवसेनेकडून सुदर्शन राठोड, राष्ट्रवादीकडून समाधान जाधव, बंडू भुसारे, कुंदन पवार. भाजपाकडून रमण जायभाये, धरमसिंग राठोड. प्रहार किंवा वंचित बहुजन आघाडी करून या परिसरात अनेक वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता, सर्वांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणारा, काही दिवस राष्ट्रवादी तर काही दिवस शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असलेले, ज्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा फौज-फाटा असलेले या विभागाचे दबंग व्यक्तीमत्व किशोर पवार पाटील हेच या गटातून निवडून येणार अशी बतावणी त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
या मतदारसंघातून निवडून आल्यास या संघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असे मत आमच्या प्रतिनिधी जवळ किशोर पवार पाटील यांनी बोलून दाखविले.
अनेक छोटे-मोठे पक्ष पक्षाचेही कार्यकर्ते सध्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्याचाही मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच सध्या कोरोना काळ जरी असला तरी निवडणुकीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.