किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट पंचायत समितीमध्ये विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाई होणार ?

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

किनवट पंचायत समितीमध्ये कार्यालयीन कर्मचारी गट विकास अधिकारी यांच्या आशीर्वादाने कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर असल्याचे दिनांक 20/09/2021 रोजी निदर्शनास आले
किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नेहमीच बारा वाजेच्या नंतरच कर्तव्यावर येत असतात त्यांच्या अशा वागणुकीमुळे कार्यालयातील कर्मचारी हे सुद्धा अधिकाऱ्या सारखेच वागत असल्याचे दिनांक 20/09/2021 रोजी प्रत्यक्ष पहावयास मिळाले यासंबंधी गट विकास अधिकारी यांच्याशी दुपारी 1 वाजता मोबाईल द्वारे विचारपूस केली असता गट विकास अधिकारी यांनी मला पंचायत समिती येण्यास वेळ लागतो असे सांगितले.

त्यावेळेस पंचायत समिती परिसरात मदनापूर येथील शंभर ते दीडशे नागरिक गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन मदनापुर ग्रामपंचायतीमध्ये 17 सप्टेंबर रोजी स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्या बाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन देणार असल्याचे समजताच गट विकास अधिकारी यांनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत कार्यालयाकडे येण्याचे टाळले.
यामुळेच कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर कोणतीही भीती वरिष्ठांची राहिलेली नाही. वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन सदर प्रकरणात काय कारवाई करतील याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

337 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.