अखेर येजगी पूल सर्व वाहतूक बंद करण्याच्या जिल्हाधिकार्यांनी दिल्या सुचना
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10. जिल्यातील बिलोली तालुक्या मधील येसगी येथील महाराष्ट्र व तेलंगना राज्याला जोडणाऱ्या ८०० मिटर लांबीच्या मुख्य पुलाच्या एक्ससेशंन जाँईट (Expansion joint ) मध्ये वाढ झाली आहे.या बाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी ड्रा.विपिन इटनकर यांनी दि.८ सप्टेंबर रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास येसगी येथील पुलास भेट देऊन पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.व पुढील धोका लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक बंद करण्याच्या सुचना दिल्या.
येसगी येथील पुलाचे बांधकाम इ.स १९८४ – १९८५ मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.एन.टी रामाराव व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचा शुभारंभ करण्यात आला होता.
एकंदरीत पुलाचे आयुष्यमान व काही वर्षापुर्वी पर्यंत या पुलावरून झालेल्या ओव्हरलोड रेती वाहतूकीच्या अवजड वाहनांमुळे गेल्या चार-पाच वर्षापुर्वी सदर पुलाची काही पिलरला व साईडजेन्टस मध्ये काही तड्य गेली असल्यामुळे पहाणी करण्यात आली.व या पुलावरून वीस मेट्रीक टन भाराच्या वाहणास वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली होती.अशात दि.६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे व अधिकचा भर म्हणून तेलंगणातील पोचमपाड धरणातुन व लातूर जिल्ह्यातील धरणातुन अधिकचे पाणी सोडल्यामुळे या पुलावरील प्रसरण सांध्यात वाढ झाली.तज्ञाच्या मते प्रसरण सांध्यात गरजे पेक्षा जास्त वाढ झाली आहे.ही धोकादायक बाब लक्षात घेऊन सध्या चारचाकी वाहतूक बंद करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.सदर पुलाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी कांही दिवसात तज्ञ अधिकाऱ्यांची टिम या पुलाची पाहणी करणार असल्याचे समजते.सध्या याच पुलाच्या खालच्या बाजूस निझामकालीन पुल असून या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथून होणारी वाहतूक बंदच आहे.आता तेलंगणात जाणाऱ्या प्रवासी व वाहतूक दारांकरीता कुंडलवाडी- माचणूर,खंडगाव,बोधन व कुंडलवाडी,धर्माबाद,बासर हा मार्ग उपलब्ध असून संबंधित प्रशासनाने वाहतूक दारासाठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी नाईक,तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे,उप अभियंता अनिल जाधव,गट विकास अधिकारी प्रकाश नाईक,मंडळ अधिकारी सगरोळी बाबूराव मुळेकर,पोलिस उप निरिक्षक सय्यद,सगरोळीचे बिट जमादार जनार्दन बोधने यांच्यासह परिसरातील सरपंच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.