किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सकाळी 7 वाजता पासून आयटीआय मध्ये किनवट विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी # 14 टेबलवर 24 फेऱ्यात येईल अंतीम निकाल

किनवट : शनिवारी (ता.23 नोव्हेंबर 2024) सकाळी 7 वाजता पासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , गोकुंदा (किनवट) येथील कार्यशाळेत उभारलेल्या भव्य मतमोजणी कक्षात  83- किनवट विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणूकीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. असे सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी कळविले आहे.
     महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता बुधवारी (ता. 20) घेण्यात आलेल्या मतदानात एक लाख 42 हजार 273 पुरुषांपैकी 104154, एक  लाख 36 हजार 381 स्त्रीयांपैकी  96342 व 11  ईतरां पैकी तिघांनी अशा  एकूण दोन लाख 78 हजार 665 मतदारांपैकी दोन लाख 499 (71.95% ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे.
     331 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रातील मतांची मतमोजणी 14 टेबलवर 24 फेऱ्यात होणार असून टपाली मतपत्रिकांची मतमोजणी स्वतंत्रपणे टेबलवर होणार आहे. जिल्ह्याभरातून इतर विधानसभा मतदार संघातील अधिकारी – कर्मचारी यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया होऊन मतमोजणी पर्यवेक्षक , मतमोजणी सहायक , सूक्ष्म निरिक्षक व शिपाई अशी टेबलविहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
     स्ट्राँगरूम मधून मतदान यंत्र ने-आण करणे, टेबलनिहाय रो ऑफिसर , संगणकीय नोंदणी, मानवीय पडताळणी त्यानंतर फेरीनिहाय निकाल तयार करणे, सिलिंग पथक असे विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

सुसज्ज मिडीया कक्ष
भारत निवडणूक आयोगाने ज्यांना हिरव्या रंगाची प्राधिकार पत्र दिले अशा पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी माध्यम प्रतिनिधीना संपर्क करण्यासाठी इंटरनेट, संगणक, टिव्हीची व खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांना माध्यम कक्षापर्यत आपला मोबाईल वापरता येईल.  मात्र कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. याठिकाणी नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे व केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे या मीडिया कक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत पाच किंवा त्यापेक्षा मर्यादित पत्रकारांचा गट करुन पाहणी करता येईल. माध्यम कक्षातून फेरीनिहाय माहिती, परवानगी मिळालेले छायाचित्र ई-मेल व व्हॉटसअप ग्रुपवर प्रसिध्दीसाठी देण्यात येईल.

     तहसिलदार (किनवट) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, तहसिलदार (माहूर ) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि  किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचे सह नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, व्ही.पी. राठोड,  राजकुमार राठोड , केलास जेठे, मास्टर ट्रेनर  मल्लिकार्जून स्वामी, के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , नितीन शिंदे, व्ही.टी. सूर्यवंशी,  गोविंद पांपटवार, संदीप पाटील , प्रभू पानोडे , संतोष मुपडे, नामदेव धोंड , संदीप कदम आदिंसह विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई व कोतवाल मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
    
चोख पोलिस बंदोबस्त
     83- किनवट विधानसभा मतदार संघाचे बंदोबस्त प्रभारी अधिकारी तथा उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला यांच्या नेतृत्वात पोलिस विभागाच्या वतीने मतमोजणीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

मतमोजणी अधिकारी -कर्मचारी प्रशिक्षण
     येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे), सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव, प्रशिक्षण कक्षाचे सहायक अधिकारी मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी यांनी मतदान यंत्रावरील मतमोजणी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी टपाली मतमोजणी विषयी मतमोजणी अधिकारी -कर्मचारी प्रशिक्षणात सविस्तर माहिती दिली.

95 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.