अज्ञात वाहनाच्या धड़केत दहेली तांडा ते दहेली रस्त्यावर एक कोल्हा ठार
किनवट: अज्ञात वाहनाच्या धड़केत थोड्या वेळापूर्वी दहेली तांडा ते दहेली रस्त्यावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शेताजवळ एक कोल्हा ठार झाला आहे.
काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सभेसाठी किनवट येथे जात असताना एका शेतात मादी वानरांच्या गर्भाशयात पिल्लू अडकल्याने मदतीला धावून गेले.
डॉ.राजेश राठोड आणि जुनापाणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक सोबत वनपाल राठोड साहेब वनरक्षक टिम ने वेळा तुन वेळ काढून एका प्राण्यांच्या जीव वाचविले.
परंतु मांडवी चे वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वनसंरक्षक वनरक्षक हे मुख्यालय राहत नाहीत नांदेड वरून ये जा करत असल्यामुळे मांडवी वन परिक्षेत्रामध्ये काय चाललेले आहे, किती प्राण्यांना आपला जिम गमवावा लागत आहे याची या मांडवी वन विभागाला काही माहिती मिळत नाही.
अज्ञात वाहनाच्या धड़केत थोड्या वेळापूर्वी दहेली तांडा ते दहेली रस्त्यावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शेताजवळ एक कोल्हा ठार झाला आहे. या संबंधी मांडवी येथील वनाधिकारी ला फोनवरून माहिती मिळविण्यासाठी फोन लावला असता बेल जाऊनही फोन उचलला नाही.राठोड यांनी फोन उचलला पण माहिती न देताच कट केला.
यापूर्वी सारखणी घाटात आठ दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. परंतु हा बिबट्या कुठे गायब झाला? याचा अजूनही या वनविभागाला थांग पत्ता लागला नाही व याचे उत्तरही समोर आले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्या हा जंगलात पळून गेला असावा. अशी त्यांची उत्तर आहेत.
आशा कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करावी असे अनेक निवेदने ही वरिष्ठांकडे पाठवली असल्याचे समजते परंतु अजूनही यावर कोणतीच कारवाई झाली नाही अशी परिस्थिती या विभागाची आहे त्यामुळे वरिष्ठानी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करून कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी वनप्रेमीतून संताप जनक भावना समोर येत आहे असे न झाल्यास मांडवी सर्कल मधून मोठा जनआक्रोश समोर येण्याची भीती वर्तवल्या दिल्या जात आहे.