किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती संभाजी ब्रिगेड लढवणार-जिल्हाध्यक्ष- भगवान कदम

असंख्य कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश…

किनवट प्रतिनिधी

दि- 21 रोजी किनवट येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक व आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव दशरथ कदम जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचा तालुका कार्यकारिणीचा आढावा तालुकाध्यक्ष सचिन कदम यांनी जिल्हा कार्यकारिणी कडे सादर केला.प्रास्ताविक किनवट तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचा तालुक्याचा आढावा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट यांनी मांडला.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम जिल्हा कार्यकारिणी यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.यावेळी भटक्या विमुक्त संघटनेचे किनवट तालुकाध्यक्ष सचिन सातपुते, अविनाश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला…

नवनियुक्त निवडीत गोविंदा आरसोड जिल्हा कार्याध्यक्ष शिवा पवार किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष गणपतराव जाधव कामगार आघाडी तालुकाध्यक्ष पांडुरंग बादड तालुका सहसचिव नरेंद्र संकेनेनिवार शहर उपाध्यक्ष चंद्रकांत साळवे तालुका कार्याध्यक्ष आकाश इंगोले तालुका प्रसिद्धी प्रमुख जामगे उमरी बाजार सर्कल प्रमुख यांची निवड करण्यात आली…

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम जिल्हा सचिव दशरथ कदम व्यंकटराव कदम संतोष कदम मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे तालुका सचिव ज्ञानेश्वर कदम जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन कदम तालुका सचिव समाधान उठकर शहराध्यक्ष जवाहर पवार रितेश मंत्री विशाल शिंदे राम काकडे शुभम काळे शेख जलाल शेख शमीम शेख नदीम शेख गुल्फाम यांच्या सह असंख्य संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचलन ज्ञानेश्वर कदम यांनी केले आभार पांडुरंग बादड यांनी मांडले…

148 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.