हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर.
किनवट/प्रतिनिधी: हिंगोली लोकसभा मतदारसंघात या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत टक्कर होणार असून या या राजकीय कुस्तीच्या आखाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे बलाढय उमेदवार हातात मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नाही.
यापूर्वी हिंगोली मतदारसंघाचे खासदार म्हणून हेमंत पाटील यांनी नेतृत्व केले आहे. परंतु भाजपाच्या वतीने केलेल्या सर्व्हे मध्ये ते पिछाडीवर असल्याचे बोलल्या जात आहे. महायुती तर्फे हेमंत पाटीलच आपली जागा राखतील का? की दुसरा उमेदवार मिळेल याची उत्सुकता मतदारसंघात दिसून येत आहे.तर वंचितही या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करणार असल्याचे बोलल्या जात आहे.
सामना तिरंगी होतो की दुरंगी थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.