बाबा सोना पीर दर्गा उरूस श्री रेणुका देवी संस्थान कडून महाशिवरात्रीनिमित्त एक दिवसीय अन्नदान संपन्न मालकिणीच्या रफिक पैलवानने मारली शाही कुस्ती
श्रीक्षेत्र माहूर :माहूर शहरात गेल्या पाच तारखेपासून सुरू असलेल्या सरकार सोनापीरबाबा उरूस निमित्त दि सात रोजी सलीम जावेद कवाल मुंबई यांच्या कव्वालीने भाविकांना मंत्रमुग्ध केले तर दिनांक आठ रोजी दुपारी झालेल्या कुस्तीच्या जंगी दंगलीच्या शाही मुकाबल्याची कुस्ती माळकिनी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील रफिक पैलवान ने मारून उ रूसाची शान वाढविली
सोनापीर बाबा उरूस निमित्त माहूर शहरात गेल्या पाच तारखेपासून इकबाल शकील वारसी हैदराबाद सुफीक कवाल यांच्याकडून महफिले समा तर दिनांक सहा रोजी नसीम जानी कवाल नागपूर यांचेकडून मैफिले कव्वाली तर दिनांक सात रोजी सुप्रसिद्ध कवाल सलीम जावेद यांच्याकडून कव्वालीचा शानदार कार्यक्रम सादर करण्यात आला तर दिनांक आठ रोजी दुपारी सोना पीर बाबा दर्गाह मैदानात कुस्त्यांच्या जंगी मुकाबला मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन इसाखान सरदार खान पठाण माजी नगराध्यक्ष किनवट यांचे हस्ते होऊन शेकडो पैलवानांनी कुस्त्यांच्या जंगी दंगलीत भाग घेतला अंतिम शाही सामना रफिक पहलवान माळकिनी यांनी जिंकल्याने उपस्थितांनी त्यांना डोक्यावर घेऊन जल्लोष साजरा केला
दिनांक 9 मार्च रोजी सप्त खंजिरी कीर्तनकार तुषार सूर्यवंशी यांचा कार्यक्रम असून दिनांक 10 मार्च रोजी मुराद अतिश कव्वाल यांचा कव्वालीचा जोरदार कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे
दिनांक नऊ आणि दहा रोजी होणाऱ्या सर्व धर्मीय कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन सज्जादा नशीन साजिद उल्हाह जागीरदार मुजावर बाबर शेख फकीर मोहम्मद यांचे सह वसंत कपाटे विजय आमले मनोज कीर्तने अकबर भाई बाबूखा फारुकी यांचे सह सानी भाई पुसद यांनी केले आहे
___________________________
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक आठ रोजी महाशिवरात्री निमित्त गडावरील श्री रेणुका देवी संस्थान कडून उरुसात आलेल्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केल्याने सर्वधर्मीय भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला बाबा सोना पीर दर्गाह कमिटी सर्व धर्मीय नागरिकांसाठी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याने यावर्षी चार दिवसात लाखो भाविकांनी सहभाग नोंदवला आहे