औरंगाबाद येथे यंत्रचालकांचा भव्य राज्यस्तरीय मेळावा. उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदेड: महावितरण मधील यंत्रचालकांचे ज्यादा कामाचा मोबदला देण्यात यावा. व वेतन अॕनामलीचा प्रश्न सोडवण्यात यावा.राज्यातील सर्व उपकेंद्र अपडेट करण्यात यावे. व विविध मागण्यासाठी यंत्रचालकाचेसंघटना विरहित भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन औरंगाबाद येथे दिनांक 05 नोव्हेंबरला करण्यात आले असून या मेळाव्याला सर्व यंत्र चालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजय रणखांब, बालाजी सकरगे, रमेश वडगावे,व सर्व संघटनेतील यंत्रचालकांनी व यंत्रचालक बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व विभागांमध्ये यंत्र चालकांना ओव्हरटाईम देण्यात येत असतो. परंतु फक्त औरंगाबाद प्रादेशिक विभागातील यंत्रचालकांचा ओव्हर टाईम बंद करण्यात आला असून यामध्ये यंत्र चालकांनी काम करून सुद्धा त्यांना मोबदला मिळत नसल्यामुळे यंत्र चालक बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कंपनीकरण झाल्यानंतर कुठलाही बदल होणार नाही असं त्यावेळी सांगण्यात आले परंतु यंत्रचालकाचे पदोन्नती चॕनल हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून कंपनीकरणापूर्वी यंत्र चालकांना पारेषण मध्ये मोठ्या पदावर पदोन्नती होत होती परंतु ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रचालकाचा वेतन तफावतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.वेतन तफावत हा प्रश्न प्रलंबित असून एकाच पदावर काम करणारे यंत्र चालक असताना पारेषण आणि महावितरणच्या यंत्रचालकाच्या वेतनामध्ये मोठी वेतन तफावत निर्माण झालेली आहे .ही वेतन तफावत मानवनिर्मित असून वेतन तफावत तातडीने
महावितरण विभागाने निकाली काढला पाहिजे. तसेच राज्यातील सर्व उपकेंद्रे अपडेट करणे महत्त्वाचे असून अनेक उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या असताना यावर प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे. सुरक्षा गार्ड प्रत्येक उपकेंद्राला देण्यात यावे. विदर्भातील सर्व उपकेंद्रांना सुरक्षा गार्ड उपलब्ध आहेत परंतु मराठवाड्यातील उपकेंद्रांना सुरक्षा गार्ड देण्यात आलेले नाही. आदेश निघून सुद्धा सुरक्षा गार्ड पुरविण्यात आलेले नाही. राज्यातील अनेक उपकेंद्रात फर्निचर व विविध समस्या असून प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन सोडण्याची मागणी ऑपरेटर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या विविध मागण्यासाठी राज्यस्तरीय महामेळाव्याचा आयोजन ऑपरेटर बचाव कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथे करण्यात आलेले असून त्यासाठी राज्यातील सर्व यंत्र चालकांनी या महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ऑपरेटर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.